Ticker

6/recent/ticker-posts

गरीब माणसांचे काय ? - एस टी धम्मदिक्षीत

चीनच्या व्युहान शहरातुन फोफावलेल्या जीवघेण्या कोवीड १९ कोरोना या जीवघेण्या विषाणूनं जगभरात थैमान घातले आहे.बघता बघता गेल्या  वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान हा विषाणू प्रचंड वेगाने धाव घेत अखेर आपल्या भारतातही येऊन पोहचला आहे.सुरवातीला केरळमध्ये हा कोरोना लागण झालेल्या रुग्ण आढळून आला होता.त्यानंतर तो सर्व देशभरात एकावरुन एक असे शेकडोंच्या घरात नसानसात तो भिनला जातोय.
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली. राज्याराज्याच्या ,जिल्ह्याजिल्ह्यांच्या,गावागावाच्या सिमादेखील बंद केल्या आहेत.या जीवघेण्या कोरोना रोगांवर आज अखेर ठोस उपाययोजना किंवा प्रतिकार करणारी लस उपलब्ध नसुन यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच केंद्र, राज्य, जिल्हा, गाव प्रशासन सुद्धा या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात संचारबंदी लागू असताना भारतीय नागरिकांनी रस्त्यावर फिरु नये किंवा या कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या लोकांना सुरक्षाव्यवस्था पोलिस प्रशासन यांकडुन कडक कारवाई केली जात आहे.

उल्लंघनकर्त्यांची चोप दिलेला अनेक चित्रफिती सोशल मिडिया,टिव्ही, तसेच अनेक माध्यमातून दाखवली जात आहेत.या संचारबंदी लागू केल्यामुळे माणसांची रस्त्यावरील ये जा बंद झाली.पण या देशात सर्वच नागरीकांना राहण्यास घरे आहेत अश्या समजुती करणं चुकीचं आहे.कारण स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरी देखील आजही लाखो लोक महामार्गाच्या पुलाखाली आभाळाचं पांघरुन अन् जमिनीचं अंथरुण करुन रोजंदारीवर, दिवस मजुरीवर,कोणी रस्त्यावर पडलेल्या कचाराकुंडी,गटारं , मसणवट्यावरचे नैवेद्य खाऊन पोटं भरणारी लाखों लोकं या देशात राहतात.मग अशा लोकांनी कोणत्या घरादाराच्या दारं खिडक्या बंद करून कुठे अन् कसं जगायचं. आजही लाखो लोक स्टेशन वर मंदिरासमोर गाव  शहरांच्या बाजार पेठेत एक दोन रुपये भीक मागून पोटाची खळगी भरतात.मग लोक बाहेर आलेच नाहीत तर या लोकांची पोटं कशी भरणार अशा लाखों लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आजही अंगावर घालण्यास पुरेसे कपडे नसणारी लाखो लोक या देशात राहतात.या लोकांनी तोंडावर मास्क फडके बांधून पोटास काय बिब्वा डागुन मरायचं की काय? वर्ष उलटले तरी देखील या पसरलेल्या रोगांनं थांबण्याचं नाव नाही.मग महिन्यांवर पगारांवर राहणारी सरकारी कर्मचारी वगळता किती तरी लाखो लोक महिण्याच्या पगारावर राबुन उदरनिर्वाह करतात.या लोकांचं काय.?

 या लोकांचीही संचारबंदी दरम्यान पोटापाण्यासाठी तारांबळ उडाली आहे.या देशात लाखो लोक शेती व त्यावर आधारित व्यवसायावर अवलंबून आहेत.पण शेती व्यवसायात पिकलेलं जसं पुर्वी म्हणजेच महिन्यांपूर्वी चालत होतं ते चलन खुप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.अनेक लोक बांधकाम तसेच छोटीमोठी कामं करून राहत होते तर या लोकांची सुद्धा हिच परिस्थिती पाह्यला मिळते.

  वर्षा अखेर कोरोनाची दुसऱ्या लाटेची सर्वात झाली अन् नऊ महिन्याच्या कालावधीनंतर मरणाच्या अंधारातून उठू पाहणाऱ्या माणसाला मरणाची काळरात्र भयाण अंधार दिसू लागली. दरम्यानच्या कालावधीत निघालेल्या लसिने आजारातून बरे होण्याच्या आशेनं काही प्रमाणात लोकांनी मोकळा श्वास घेतला होता. पण आलेल्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेने माणसाने न पाहिलेले मृत्यूचे तांडव पाहण्यास मिळते आहे.सद्य परस्थितीला रुग्णांना  भेडसावणारी सर्वात मोठीं भीती म्हणजे श्र्वास घेण्यासाठी लागणारा अपुरा साठा,तसेच अनेक लोकांचे बेड मिळत नाहीत तर काहींना झालेल्या  रोगावर उपचार करण्यास हॉस्पटल मध्ये जागा सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. सगळीकडे मृत्यूच्या बातम्यांनी सुन्न करणारी भयावह अवस्था लोकामध्ये पाहायला मिळते आहे.

अखेर या महामारी मध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास जागा सुद्धा अपुरी पडत आहे. आजवर न पाहिलेले मृत्यू तांडव याने संपूर्ण नागरिकांवर भीतीची,दुःखाची शोककळा पसरली आहे.

या महामारी मध्ये हातातून वाळूचा कण निसटून जावा तसाच काहीसा चालता बोलता जिवाभावाची मानस कायमची निघुन जात आहेत. चहूबाजूला कोणाचा बाप तर कोणाची आई,कोणाचा भाऊ,कोणाची बहीण, रक्तामासाची नातीगोती  या कोरोणाच्या महामारी मध्ये  सोडून जाताना दिसत आहेत. हा कोरोना लागण ग्रस्तांची वाढती आकडेवारी अन् त्यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वर्तमानपत्र टीव्ही सोशल मिडिया वर दाखवली जाते पण काही कालावधीनंतर हा कोरोना विषाणू भारतातुन निघून जाईल ही पण या कोरोनामुळे मेलेल्यांच्या पेक्षा या देशात उपासमार अन् भुकबळीनं मेलेल्यांची संख्या मात्र खुप मोठी असेल एवढे नक्की आहे.

                     ‌मी भारतातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की ,

   स्वताच्या आरोग्याची काळजी घ्या..!!

  सुरक्षीत रहा....!!

शासनाच्या आदेशाचे पालन करा...!

अन् नक्कीच कोरोनावर सर्वजण मात करुया...!!

कोरोनाला हरवुया....!!

लेखक:- #एस.#टी.#धम्मदिक्षीत.

           काळामवाडी,कोल्हापूर. 

Post a Comment

0 Comments