Ticker

6/recent/ticker-posts

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली

 

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !"
१)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
२) एन.गोपालस्वामी अय्यंगार.
३) डी.पी.खेतान.
४) कृष्णास्वामी अय्यर.
५) बी. एल. मित्तल.
६) के. एम.मुन्शी.
७) सय्यद अहमद अब्दुल्ला.


हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व काळात) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३७९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर काळात) भारत-पाक फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोनजण परदेशात गेले. अन्य दोनजण सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकाचे तर निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता आणि उरले ते फक्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनीच एकट्याने रात्रंदिवस राबून स्वत:च्या आजाराची पर्वा न करता भारताचे संविधान लिहिले.


संविधान निर्मिती करिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा (प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते.मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्यावर पडली...


अशी शासकीय दस्तऐवजी नोंद आहे सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथाचा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण बाबासाहेब आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्याना.. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही...


"भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन.. "बाबासाहेब हे भारतीय व घटनेचे शिल्पकार नव्हतेच !" असे सांगून सर्व-सामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे, घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत..


पुरावा क्र. १
मसुदा समितीचे एक सभासद टी.टी.कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला. त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चवथे सभासद संस्थानिकां संबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते ही उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ.आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."


पुरावा क्र. २
घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.. ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."


पुरावा क्र. ३
घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."


डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा.....


Post a Comment

0 Comments