Ticker

6/recent/ticker-posts

लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?


लॉर्ड बुद्धा चॅनेलनं बौद्ध समाजातील लोकांची दिशाभूल केली जात आहे का?? १४ आक्टोबर १९५६ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी सोबत आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्वप्न होतं की, संपूर्ण भारत हा बौद्धमय करायचा होता पण हे स्वप्न अधुरं राहिलं. नंतरच्या काळात अनेक गायक शाहिर कवी लेखक साहित्यिक अनेक अनुयायींनी बौद्ध धम्माचा प्रसार व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले.दरम्यानच्या काळात बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी एक सुलभ माध्यम असणं गरजेचं होतं. खरं पाहिलं तर हक्काचं विचारपीठ आपल्या समाजाला मिळावं याकरिता समाजानं लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा करून जन्मला आलेलं बौद्ध लोकांचं स्वतंत्र चॅनल म्हणजेच लाॅर्ड बुद्धा चॅनल होय.हे चॅनल सुरू करण्यामागचं ध्येय उद्धिष्टे फार महत्त्वाची होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारं समाज प्रबोधनासाठी हा चॅनल उपयुक्त ठरेल या आशेने समाजानं हे चॅनल उभं केलं होतं. एकंदरीत बौद्ध संस्कृतीची माहिती प्रचार प्रसार व्हावा.प्रबोधनाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सहज घराघरात पोहचले जावेत ही अपेक्षा होती.आजवर आपल्या समाजातील लोकांनी दिलेला प्रतिसाद व तळागाळातील गावागावात हे चॅनल पोहचले त्यामुळे अल्पवाधीत प्रसिद्धीस आले.या चॅनल चर्या माध्यमातून दिली जाणारी माहिती किंवा बातम्या म्हणा बौद्ध संस्कृतीची माहिती न चुकता पाहणारी आपल्या समाजातील लोकांच्या पसंतीचे चॅनल म्हणुन वाहवाही मिळत गेलीच आजही समाजाचं मत तसेच आहे. पण दरम्यानच्या काळात सदरच्या प्रसिद्धीमुळे विस्तारलेलं चॅनल हे जाहिरातींच्या भोवर्यात अडकत गेले.तसेच सद्ध्या चालु असलेलं रामायण महाभारत यांच्या कार्यक्रम व जाहिरात व राशीभविष्य असे धर्माविरुद्ध असणारे विचार या माध्यमातून प्रसारीत होत आहेत.त्यामुळे एकंदरीत समाजातील लोकांची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.एकंदरीत पाहता जे अपेक्षित होते त्याच्या उलट प्रेक्षेपण या माध्यमातून प्रसारीत केले जात आहे. सदरच्या कार्यक्रम व जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अनेक अनुयायींनी थेट संपर्क आयु.खैरकर अन्य संबंधित संचालकांना चौकशी दरम्यान दुरध्वनी वर संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही.उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता भीषण वास्तव समोर आलं की माझा यांच्याशी काहीच संबंध नाही अश्या स्पष्ट शब्दात उत्तर मिळत आहेत. हे चॅनेल हे एकंदरीत ब्राम्हणी व्यवस्थेला अपेक्षित असलेल्या मनुवादी व्यवस्था अपेक्षित असलेल्या विकलं गेलं आहे अशा अनेक बातम्या प्रसार माध्यम व्हाटसप फेसबुक भिंतींवर संदर्भाचे मेसेज व्हायरल होत आहेत. सदरील बाब जर खरी असेल तर संबंधित संचालकांनी पुर्वसुचना न देता परस्पर चॅनल विकून पैसे उडवणं हे समाजाला थुक्का लावणं लांच्छनास्पद बाब आहे.एकंदरीत बौद्ध समाजातील लोकांच्या विश्वासाला तडा जाण्याचा प्रकार घडवुन आणला आहे.अथवा हि बाब खोटी असेल तर सर्व संचालक मंडळ अन् संबंधित लोकांनी माध्यमांसमोर येऊन या सारखे काही घडलं नाही हे सिद्ध करून दाखवावे अन्यथा बौद्ध समाजातील लोक संबंधित संचालकांचा समाचार घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. अशा समाज गद्धारांना त्यांची जागा दाखवून देण्यास आपला समाज मागे हटणार नाही.येणार्या काळात असंच चालु राहिलं तर चॅनल चर्या माध्यमातून अशा अनेक मनुवादी विचारांचे कार्यक्रम प्रसारीत केले तर आपला समाज संचालकांवर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आयु.एस.टि.धम्मदिक्षीत. काळामवाडी कोल्हापूर ९६११२५३४४१.




टिप :- लेखकांचे स्वताचे विचार येथे प्रकट केलेले आहेत. वरील लेख कोणी ही लेखकांना न विचारता कॉपी पेस्ट केल्यास कॉपीराइट एक्ट वर्ष १९५७ प्रमाणे सेक्शन ६३ च्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments