Ticker

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कड़े होती तब्बल २० कोटी रुपयांची पुस्तके


जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे...


कायदा या विषयावरील - ५०००

ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००

ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ

धर्म या विषयावरील - २०००

ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००

ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ

अर्थशास्त्र या विषयावरील- १२००

ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००

ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००

ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००

असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.

पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.

Post a Comment

0 Comments