लाखनी तालुक्यातील सोमलवाडा येथे शुक्रवार (ता.२६ मार्च रात्री ९:०० ते २७ मार्च सकाळी ९:३०) च्या दरम्यान अज्ञातांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अथवा तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती ला तोडून विटंबना केल्याने गावात शनिवार (ता.२८) सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. गावातील अस्मिता हुमणे (राह. सोमलवाडा) यांच्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन लाखनी येथे दिनांक २७ मार्च २०२१ ला सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान तक्रार नोंदवण्यात आली.
नेमकं काय घडलं होत ?
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात सोमलवाडा हे गाव आहे तिथे बौद्ध समाज बांधवांनी ५०-६०वर्षे अगोदर सार्वजनिक बुद्ध विहार बांधण्यात आले होते त्या वेळी विहारात बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसविण्यात आली होती. प्रत्येक दिवशी विहारात वंदना घेण्यात येते तसेच विहारात नेहमी उपासक व उपासिका साफ सफाई करण्यास येत असतात. त्यामुळे बुद्ध विहार नेहमी सगळ्यांसाठी खुले असते. दि. २७ मार्च ला सकाळी ९ ते ९:१५ च्या दरम्यान अस्मिता हुमणे ह्या एकट्याच विहाराची साफ सफाई करण्यासाठी गेल्या होत्या त्या वेळेस त्यांना तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर भगवा रंगाचा कापड दिसला झाकलेला आढळून आला तेव्हा त्यांनी विहाराच्या आत बसलेल्या राजकमल हुमणे आणि रमेश कांबळे यांना अस्मिता हुमणे नि विचारलं " मूर्ती कधी कापडाने झाकलेली राहत नाही आज कशी का झाकलेली आहे ? " या वर राजकमल आणि रमेश यांनी उत्तर दिल "माहीत नाही " तेव्हड्यात तिघांनी जाऊन मूर्ती वरील कापड उचललं तर तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती चा उजवा हाथ कोहणीपासून तुटलेला आढळला व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती च्या उजव्या हातातील तर्जनी बोट तुटलेलं आढळलं व त्याचे तुकडे खाली पडलेले होते, त्यांनतर हळू हळू गावात मूर्ती ची विटंबना झाल्याची माहिती पसरताच गावाचे बरेच लोक आणि गाव जवळील लोक विहाराच्या प्रांगणात जमा झालेत. अस्मिता हुमणे यांनी पो.स्टेशन लाखनी येथे भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (प्रकरण १५ - कलम २९५ कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासनास्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे, शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.) च्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचा महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा .
नागपूर जिल्हातिल ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमलवाडा येथे जाऊन घटनेची माहिती घेतली या संदर्भात त्यांनी लाखनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिले. ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने २४ तासाच अल्टीमेशन देण्यात आले यावेळात सदर आरोपींना अटक नाही करण्यात आले, तर आम्ही पँथर स्टाईलने आंदोलन करू. या घटनेची माहिती भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली. सदर घटनेचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा दयावी अन्यथा संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करु, असा इशारा यावेळी देण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांकडून करण्यात आले, ही घटना प्रकटीकरण नंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष विशाल गेडाम सोबत अनेक कार्यकर्त्यांनी सोमलवाडा येथे हजेरी लावली. सदर प्रकरणात आरोपीस अटक नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी येऊन पँथर स्टाईल आंदोलन करतील असे पँथर सेनेच्या वतीने सांगण्यात आले. सोमलवाडा बौद्ध विहारातील तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना प्रकरणात लाखनी चे तहसीलदार यांनी आरोपीचा शोध न घेता पुतळ्यांचे डागडुग्गी केल्यामुळे व समस्त आंबेडकरवादी बांधवांचे भावना दुखावल्या व दहशत निर्माण केल्यामुळे तहसीलदार मल्लीक विरानी यांना तात्काळ निलंबित करून त्याचावर कडक कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेनी केली आहे.
या प्रकरणाचा तपास पो.उपनिरिक्षक संजय कोराचे करत आहेत.
अस्मिता हुमणे यांनी केलेल्या तक्रारीची प्रत:-
- रिपब्लिकन चळवळ टीम
0 Comments