जेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पाहून घाबरतो नागपुर चा न्यायाधीश
माहे-एप्रिल १९३७ च्या उत्तरार्धात नागपुर हायकोर्टात संतनामि आगमनदास यांचे विरुद्ध खून खटला चालू होता. मध्य प्रांतातील छत्तीसगढ़ भागातील सतनामी पंथाचे गुरु बाबा मुक्तबनदास हे त्या काळचे त्या प्रसिद्ध संत म्हणून कीर्ति पावलेले होते. त्यांचे घराने पूर्वीपासूनच सामाजिक कार्यामधे एक पाउल पुढे होते. आगमनदास हे त्यांचे भाऊ ,
माहे १७ फेब्रुवारी १९३७ च्या निवडणुकी मधे मध्यप्रांत कायदे मंडळाच्या जागेवर प्रांतिक कौंसिलमधे निवडून आलेत राजकीय डाव पेचातुन त्यांना एका खून प्रकरणी गुन्हेगार ठरविण्यात आलेत त्यांचे रायपुर च्या कोर्टमधे या खुनी प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बाबू एल.एन हरदास (त्या काळचे कार्यकर्ते होते यांनाच जय भिम चा जनक म्हणतात. ) व बाबा मुक्तनदास यांच्याशी जवळचे संबंध होते. बाबू हरदास सामाजिक कार्यकारिता मध्यप्रांताचा दौरा करीत, तेव्हा त्यांच मुक्काम बाबा मुक्तबनदासकडे असे तेथेच ते थांबत असत त्यांच्या भावाला रायपुरच्या कोर्टात फाशीची शिक्षा फर्मविली आली तेव्हा बाबू हरदास याना कल्पना देण्यात आली बाबू लगेच मुक्तबणदासकडे गेले. खुनाबद्दल सविस्तर वृतांत मुक्तबणदास यानी हरदास ला सांगितल. बाबू हरदास यानी त्यांना सल्ला दिला की हां खटला पुन्हा नागपुर च्या हायकोर्टात दाखल करा. बाबूंच्या सल्ल्याने हां खटला नागपुर च्या हायकोर्टात दाखल करण्यात आला. बाबू हरदास यानी लगेच मुंबई गाठली सरळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर याांच्या कड़े गेले बाबासाहेबांना खुनी खटल्या बाबत सर्व वृतांत बाबू हरदास यानी सांगितला. बाबासाहेबांनी विशेष हकीकत माहिती करुण घेण्यासाठी मुक्तबनदास सोबत चर्चा केली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी हा खटला निकालात काढण्याचे आश्वासन दिले बाबू हरदास मुंबई वरुण परत आलेत आरोपी च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर बाजू मांडणार आहेत म्हणून हज़ारोच्या संख्येने हायकोर्टाचा परिसर गजबजून गेला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन व्हावे म्हणून अनेक अश्पृश्य दलित बांधवांचा लोंढा हायकोर्टाकडे वळु लागला बैरिस्टर वकील पुढारी वर्ग तसेच विद्वान लोकांच्या संख्येने न्यायालय गच्च भरून गेले. सर्वांच्या मनात एकच विचार होता की, डॉ बाबासाहेब कश्या प्रकारे युक्तिवाद करतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायालयात हाज़र होण्यासाठी आले तेव्हा हज़ारो अश्पृश्य बांधवांनी एकच गर्जना केली डॉ बाबासाहेब की जय या जय घोषणेन वातावरण पलटुन गेले. बाबासाहेब कोर्टात हाजर झाले तेव्हाही जयजयकार चालूच होता. बाबू हरदास बाहेर गेले आणि सर्व मंडळिस शांत करू लागले तरी पण जयजयकार चालूच होता. बाबू हरदास शांत करून जमलेल्या लोकना सांगत होते आपन बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता आतुरलेले आहात, याची मला कल्पना आहे. मि तुम्हाला आश्वासन देतो की, सर्वाना बबासाहेबांच दर्शन होईल पण आपल्या गोंगाटामुळे बाबासाहेबांना आरोपीच्या वतीने बाजूमांडायला त्रास होतोय. करीता आपन सगळ्यानी शांत राहावे वातावरण शांत झाल्यावर बाबू हरदास न्यायालयात परतले.
न्यायालयात देखील जयजयकार थांबेना तेव्हा स्वःत बाबासाहेब लोकांवर रागावले व त्यांना म्हणाले येथे काही आंबेडकरांच भाषन नाही, हे लक्ष्यात ठेवा तुम्ही न्यायालयात उभे आहात तेव्हा वातावरण शांत झाल. सरकार तर्फे एडव्होकेट केदार बाजु मांडणार होते. सर न्यायाधीशाना धास्ति होती की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत आणि आपल्या पेक्षा कायद्याच्या क्षेत्रात वरचढ़ जाणीव न्यायमूर्तीना पदोपदी होत असावी , अशा वेळेस सर वेळेस सर न्यायमूर्तीना वाटत होते की आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये म्हणून ते दक्ष होते. पण घडल ते नेमक अश्याच वेळीस , ठरल्या प्रमाणे खटल्याचे कामकाज चालू करण्यास सर न्यायमूर्ति आपल्या आसनावर आरूढ़ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तब्ध उभे राहिले. यावर न्यायमूर्ति डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना म्हणाले, "मी येथे आल्यावर आपन कायद्या प्रमाणे मानवंदना का केली नाही ?"
यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिल , "आपण न्यायमूर्ती आहात हे कश्यावरुन ओळखावे ? "
न्यायमूर्ति गोंधळात पडले त्याना वाटले आपन काही चुकलो का? म्हणून इकडे तिकडे पाहु लागले. न्यायमूर्तिनी गळ्याला हाथ तर पांढरी फितच बांधली नाही. त्वरित ड्रेसिंग रूम मधे जाऊन पांढरी फित बांधून आलेत तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना नमस्कार केला.
खून खटल्यावर वाद प्रतिवाद झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर न्यायमूर्तिना आरोपीच्या निर्दोषाबद्दल एक खलीता पत्र दिल. तेव्हा सर न्यायमूर्तिनी आपले निकाल पत्र वाचून दाखवून निर्दोष मुक्त केले. आगबनदासला रायपुर च्या कोर्टात झालेली फाशीची शिक्षा रद्द केली सर्वाना एक आश्चर्या चा धक्का पोहचुन या खून खटल्याचा शेवट झाला.
0 Comments