Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी बोलून गेले की, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, ते प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते प्राशन करीत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण करु नये, ते मनसोक्त आणि पोटभर प्राशन करावे. म्हणजेच अन्याय अत्याचाराविरुध्द तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचेच दुध का म्हटले? हे सुध्दा विद्यार्थ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. बकरीचे, गाईचे किंवा म्हशीचे दुध पौष्टीक असताना, त्यात चांगली जीवनसत्वे असताना त्यांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा का दिली असावी? तर त्याचे मुख्य कारण हे आहे की, वाघिण आपल्या बछड्याला सतत सहा महिने आपल्या अंगावरचे दुध पोटभर पाजते. आईचे दुध पोटभर प्याल्याने ते पिल्लू अवांतर काही खात नाही. इतकेच नव्हे तर आपल्या आईने करुन आणलेली शिकारही ते पिल्लू खात नाही किंवा अन्य वाघांनी करुन आणलेल्या शिकारीलाही तोंड लावत नाही. सहा महिने झाल्यानंतर मात्र वाघिणीचा बछडा प्रत्येक्ष शिकार करतो. इतकी ताकद त्या वाघिणीच्या दुधात असते.
याचा दुसरा अर्थ असा की, वाघिनीचा बछडा शिळी किंवा मेलेली शिकार न खाता नव्या जिवंत शिकारीवर चाल करुन ती खातो. इथे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या शिक्षणातून नविन आणि जिवंत इतिहास घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून शिक्षण करावे आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असे विद्यार्थी बनावे. पण आज त्याच वाघिनीच्या दुधाला इतके निकृष्ट व महाग करुन ठेवले आहे की, अति गरीबाला ते घेणेच दुर्लभ झाले आहे किंवा घेतलच तर वाघ नाही मांजरे तयार होत आहेत तिही ताटा खालची.

Post a Comment

0 Comments