Ticker

6/recent/ticker-posts

महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर


महार बटालियन मुळेच वाचले काश्मीर
कश्मीर सीमेवर दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्या चा जो अपूर्व लढा दिला तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले , ही गोष्ट सन १९४९ ची आहे १९४९ ला बाबासाहेब महार बटालियन ला दर्शन घेण्यास कश्मीर ला गेले होते , बाबासाहेब मिलटरी प्रांगणात गेलेत सगळ्या सैनिकांच्या चेहऱ्या वर आनंदाची छटा नाचत होती, बबासाहेबांच दर्शन त्याना प्रथमच घडल होत बाबासाहेब आंबेडकर यांची नजर चोहीकडे फिरवली प्रत्येक सैनिक आदरने नतमस्तक होऊन उभा होता. त्याच क्षणी बाबासाहेबांच्या डोळ्यात आसावे तरळली एक क्षणातच वातावरण गभीर झाल एक जवान बुटांचा खट खट आवाज करत बाबासाहेब जवळ आला आणि म्हणाला, "बाबा ! काय झाल सांग ते तात्काळ सांगा आम्ही तुमच्यासाठी रक्ताचे पाट ...."
परंतु त्या सैनिकांचे बोलने संपन्यापूर्वीच बाबासाहेब म्हणाले, "तस काही नाही, त्याच अस आहे की काही वर्ष पूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी फायोनियर फोर्स करीता (हलक्या दर्जयांची जशी रस्ते बनवण्यासाठी/ पुल बांधण्यासाठी/ रस्त्यामधे दगड भरण्यासाठी इत्यादि ) आपली माणसे देण्याबद्दल मला पत्र लिहिल होत, मी त्यांना खडसून सांगितलं कि " माझी माणसं शूरवीर आहेत शत्रू सैन्याशी दोन हाथ करण्यास अन्य जमातींपेक्षा त्यांच्यात अधिक दम आहे तुम्ही त्यांना दोन हाथ करण्याची संधी ददेऊन पहा ."
इंग्रजानी माझी (डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ) शिफारस पाहून कामठी (नागपूर) मध्ये पहिली महार बटालियनची स्थापना केली. त्या नंतर सुमारे दोन वर्षयांनी दुसरी महार बटालियन स्थापन करण्यात आली तुम्ही लोकांनी  माझे शब्द खरे करून दाखवले हे पाहून मला अत्यानंद होत आहे माझ्या (डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ) डोळ्यात तरळणारी आसवे समाधानाची व आनंदाची आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द ऐकून सगळेच गहिवरले . 

Post a Comment

0 Comments