Ticker

6/recent/ticker-posts

माझ्या समाजातील लोकांचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर बंदुकीची गोळी घालून स्वतःचा जीव संपवणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब बड़ोदा संस्थानाचे स्कॉलर म्हणुन जेव्हा शिक्षण घ्यायला परदेशात जातात, तेव्हा 1915 ला M A ची पदवी व 1916 ला नॅशनल डीव्हिजन ऑफ़ इंडिया - अ हिस्टोरिक अण्ड अनिलिटीकल स्टडी नावाचा प्रबंद लिहून पी एच डी करतात, नंतर बॅरिस्टर व डी एस सी या महत्वाच्या पदव्याचा अभ्यास करीत असताना स्कॉलरशिपची मुदत संपल्यामुळे त्यांना मधेच भारतात यावे लागते. ऑगस्ट 1917ला बाबासाहेब जेव्हा परत येतात तेव्हा त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते, नियमानुसार परदेशातुन आल्यावर त्यांना बड़ोदा संस्थानात नोकरी करावी लागते, त्यासाठी ते बडोद्याला जायला निघाले, पण तिथे ही गेल्यानंतर त्याना मानहानी व अपमानाला तोंड द्यावे लागले. त्यांना राहण्यासाठी घर तर सोडा, पण सोबत अधिकारी व कारकुन त्यांचा स्पर्श देखील  होऊ नये म्हणुन दक्षता घेत, दीड दमड़ीचा चपरासीही फाइल फेकुन देइ, त्यांना पानी सुद्धा मिळत नव्हते. अशाही स्थितीत त्यांनी आपली नौकरी सुरु ठेवली. सयाजीराव गायकवाडांनी सुद्धा या बाबतीत काही करण्यास असमर्थतता दाखविली. नाइलाजाने बाबासाहेब नाव बदलुन, जास्तीचे पैसे देऊन, निकृष्ट दर्जाची रूम करुन पारशी हॉटेल मधे राहिले.
परंतु एके दिवशी 15 ते 20 तगड़े लोक काट्या घेऊन त्यांच्या खोलीवर येतात, त्यांना अपमानित करतात, शिव्या देऊन रूम सोडण्याची धमकी देतात, अशाही स्थितीत बाबासाहेब सयंमाने शांत राहून, काही तासाचा अवधी मागतात, व राहण्याची दुसरी व्यवस्था शोधतात परंतू त्यांना रूम मिळत नाही. नाइलाजाने सायंकाळी 4 वाजता रूम सोडावी लागते. गाड़ी रात्री 9 वाजता असते, मग 5 तास कुठे घालवावे?
डोक्यात राग, पोटात भूख, प्यायला पाणी नाही.
काय करावे?
कोठे जावे?
अशा अवस्थेत बडोद्याच्या स्टेशन जवळील कमाटीबाग़ या बागेत मोठ्या वडाच्या झाडाखाली बाबा साहेब बसतात व तब्बल 5 तास बाबासाहेब रडत राहतात.
का रडले बाबासाहेब ?
कोणासाठी रडले ?
त्यांना तो परदेशात घेतलेला मुक्त श्वास आठवला,
एवढ्या उच्च शिक्षणाच्या बळावरती विद्यार्थ्यांवर व प्राध्यापकांवर छाप पाडुन सर्वांना प्रभावित केले होते आणि आज आपल्याच देशात त्यांचा एवढा अपमान, जर बाबासाहेबांनी परदेशात नोकरी केली असती तर खुप पैसे कमावले असते, पण त्यांना आपल्या अज्ञानी व भुकेनी कंगाल समाजाची आठवण झाली, मी एवढा सुशिक्षित असून माझी ही अवस्था, तर मग माझ्या समाजाचा काय अवस्था होत असेल?
त्यांच्या जीवनात बदल कसा होणार?
त्यांचा उद्धार कोण करणार?
त्याचवेळी बाबासाहेब वटवृक्षाच्या झाडाखाली प्रतिज्ञा  करतात की, मी माझ्या समाजातील लोकांना पशु समान वागवणाऱ्या जातीच्या बेड्या तोडून त्यांचा उद्धार करेन, जर मी त्यांचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर बंदुकीची गोळी घालून मी स्वतः आत्महत्या करेन!
तो दिवस म्हणजे "11 नोव्हेंबर 1917" आणि बाबा साहेब ती प्रतिज्ञा पूर्ण करतात. आणि आम्हाला पूर्ण अधिकार मिळवून देतात.
तो दिवस म्हणजे आजचा 11 नोव्हेंबर, पण आज आम्ही काय करत आहोत? आज आम्ही मी, माझ घर नी माझा परिवार यातच गुंतलो आहोत.
स्वतः साठी तर जनावर पण जगते, काही बाबासाहेबांसाठी व समाजासाठी जगा.
आम्ही एक दिवस तरी समाजासाठी कधी रडणार? त्यासाठी बाबासाहेंबा प्रती ईमान राखा, आंबेडकरी साहित्य वाचा. स्वता पेटा व इतरांनाही पेटवा. आत्ता नाही पेटलो तर कायम साठी विझून जाऊ.
शिकु, संघटित होऊ आणि संघर्ष करुया.

Post a Comment

0 Comments