
16 डिसेबर 1956 रेाजी मुंबई येथे दिक्षासमारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते पण त्याआधीच 6 डिसेबर 1956 रोजी बाबासाहेबांचा मृत्यु झाला त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात भिक्कु आनंद यांनी दादासाहेबांना दोन शब्द बोलण्याची आज्ञा केली त्या वेळी दादासाहेब म्हणाले की,” *येत्या 16 तारखेस मुंबईस लाखो लेाकांना बुध्द धम्माची दिक्षा डॉ बाबासाहेब देणार होते तेव्हा तो विधी आता आजच बाबांच्या नश्वर देहाला साक्षी ठेवुन आपण पार पाडू या*” तेव्हा लाखो अस्पृश्य बांधवानी हात वर करुन दादासाहेबांच्या विचारांना दुजोरा दिला त्यानंतर त्याच ठिकाणी धर्मातर दिक्षाविधी पार पाडण्यात आला या वेळेपासून दादासाहेबांनी बौध्द धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली बौध्द धर्माचा भारतात प्रचार करण्यासाठी त्यांनी स्वतला वाहुन घेतले हेाते त्यासाठी त्यांनी दुर दुर प्रवास करुन् संपुर्ण भारताता डॉ आंबेडकरांचे विचार व ध्येय पसरविण्यास सुरुवात केली होती या उदेृशाने 16 डिसेबर 1956 रोजी मुंबई येथे बाबासाहेबांच्या उपस्थितीत बौध्द धर्मातराची प्रचंड सभा होणार होती पण बाबासाहेबांच्या पश्चात ही सभा नाशिक येथील डॉ आंबेडकर नगर येथे दादासाहेबांनी घेतली डॉ आंबेडकर नगरातील जो रमाबाई हॉल बांधलेला आहे ते बौध्द धर्मप्रचाराने केद्र व्हावे या हेतुने सिलोनचे न्यायमुर्ती यु चॅग टूग यांच्या हस्ते त्या केद्राचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात दादासाहेब म्हणाले की,’’धर्माची आवश्यकता गरिबाना आहे पीडीतांना आहे गरीब माणुस आशेवर जगतो जिवाचे मूळही आशेतच आहे आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल धर्म आशादायी बनवितो म्हणुन गरीब पीडीत धर्माला चिकटुन राहतो जगात नाव जाहिर आहे ते फक्त बुध्दाचे’’ तेव्हा याच धमा्रचा आपण स्वीकार करु असे सांगितले
डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची चळवळ संपुष्टात येईल त्यांच्या इतका प्रभावी त पराक्रमी नेता नसत्यामुहे बौध्द धर्माची चळवळ मंदावेल असा प्रचार सुरु झाला होता त्या वेळी या सर्व गोष्टी खंडन करीत दादासाहेब म्हणाले की, ” आज प्रत्यक्ष परिस्थिती अगदी उलट असुन बाबासाहेबांनी दिलेला आदेश व स्थापन केलेली संघटना दिवसेदिवस बळावत असुन बौध्द धर्माचा प्रसार सा-या भारतात प्रचंड प्रमाणात सुरु असुन भविष्याकाळात दहा कोटी पददलित समाजातील व इतर समाजातील लेाक बौध्द धर्मीय बनतील यात तिळमात्र शंका नाही यासाठी भारतीय बौध्द महासभेची अधिवेशने ठिकठिकाणी भरविण्यावर जोर घावा असा सल्ला दादासहोबांनी दिला”
1957 साली डॉ आंबेडकरांच्या इच्छेप्रमाणे शे का फे पक्ष बरखास्त करुन त्याऐवजी नव्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली पण एका वर्षातच या पक्षात फूट पडल्याने धम्मकार्याच्या चळवळीत अडसर निर्माण झाला तेव्हा नागपुर येथे 21 ऑक्टोबर 1958 रोजी भरलेल्या बौध्द महासभेच्या अधिवेशनात दादासाहेब म्हणाले की,” डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत बौध्द धर्माची दीक्षा घेऊन नंतर त्यांच्या बरोबर बौध्द धर्म स्वीकारण्याचा आम्ही घेतलेला निर्णय अत्यंत महत्वपुर्ण आहे परंतु एवढा महत्वपूर्ण निर्णय घेऊनही आम्ही योग्य त्या दिशेने प्रयत्न केला नाही व परस्परांतील कलहात गुंतुन राहिल्यास आमच्या निर्णयाला कसलाच अर्थ उरणार नाही म्हणुन आमच्यात जर भांडणे असतील तर ती आम्ही संपवून या महान कार्यासाठी स्वतला वाहून घेतले पाहिजे* ” असे सांगुन बौध्द धर्माच्या प्रसारातील अडचणी दूर करण्याविषयी सांगितले
जोपर्यत भारत देशातील जातीयता नष्ट होत नाही तो पर्यत देशात राष्ट्रिय तादात्म्य निर्माण होऊ शकत नाही असे नेहमी दादासाहेब म्हणायचे यावर उपाय आहे इतकेच नव्हे तर बौध्द धम्माशिवाय हया देशाचा उत्कर्ष होणे कदापिही शक्य नाही आणि म्हणुन प्रत्येकाने बौध्द धर्माचा स्वीकार केला पाहिजे त्याचबरोबर बौध्द बांधवांना उदेशुन ते म्हणायचे की,”आता आपण बौध्द धर्माचा स्वीकार केला आहे ज्या धर्मात अस्पृश्यता आहे त्या धर्माचा आणि आपला संबंधच नाही ” त्यामुळे बौध्द धर्माच्या प्रसाराचा आपण विचार केला पाहिजे दादासाहेबांनी हिदु धर्माच्या देवदेवतेस पोथ्यापुराणास व तीर्थस्थानास 1956 पासूनच फाटा दिला होता त्यांना मानवी धर्म हवा होता आणि बौध्द हाच एकमेव मानवी धर्म आहे असे ते सर्वाना निक्षून सांगत असत
जोपर्यत भारत देशातील जातीयता नष्ट होत नाही तो पर्यत देशात राष्ट्रिय तादात्म्य निर्माण होऊ शकत नाही असे नेहमी दादासाहेब म्हणायचे यावर उपाय आहे इतकेच नव्हे तर बौध्द धम्माशिवाय हया देशाचा उत्कर्ष होणे कदापिही शक्य नाही आणि म्हणुन प्रत्येकाने बौध्द धर्माचा स्वीकार केला पाहिजे त्याचबरोबर बौध्द बांधवांना उदेशुन ते म्हणायचे की,”आता आपण बौध्द धर्माचा स्वीकार केला आहे ज्या धर्मात अस्पृश्यता आहे त्या धर्माचा आणि आपला संबंधच नाही ” त्यामुळे बौध्द धर्माच्या प्रसाराचा आपण विचार केला पाहिजे दादासाहेबांनी हिदु धर्माच्या देवदेवतेस पोथ्यापुराणास व तीर्थस्थानास 1956 पासूनच फाटा दिला होता त्यांना मानवी धर्म हवा होता आणि बौध्द हाच एकमेव मानवी धर्म आहे असे ते सर्वाना निक्षून सांगत असत
डॉ आंबेडकरांच्या निर्वाणानंतर दादासाहेबांनी सर्व भारतभर दौरे काढून धर्मातराचा सपाटा चालु केला हेाता त्याचाच परिणाम म्हणुन दोन कोटी जनता बौध्द धर्मीय झाली हयाचे बहुताशी श्रेय दादासाहेाबांनाच आहे त्यांनी चालविलेल्या बौध्द धर्माच्या प्रचारामुळे महाराष्ट्रात तरी या सर्व माहरवाडयाचे रुपांतर बौध्दवाडयात झाले व भारतात नवी संस्कृती उदयास आली या नव्या संस्कृतीविषयी बोलताना ते म्हणाले हेाते की ,” हिदुंनी तुच्छ लेखलेल्या या गुणी समाजात स्वच्छतेची नेटकेपणाची काटकसरीचाी व साधेपणाची एक सुरेख संस्कृती जन्म घेत आहे आणि या जाणिवेमुळेच त्यांच्यात एक नवा स्वाभिमान व कडवेपणा येत आहे हजारो वर्ष दडपुन ठेवलेली मने या क्रांतीने आता प्रकट होत आहेत ” बॅकॉक येथे जी जागतिक बौध्द धर्म परिषद भरली होती त्या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणुन दादासाहेब हजर होते या परिषदेत भाषण करताना ,” बुध्दाने अंधश्रध्दा किवा धर्मभोळेपणाविरुध्द प्रज्ञा करुणा आणि समता यांची शिकवणुक देउुन ही तीन तत्वे एकत्रित सांगितलेली आहेत ” असे मत त्यांनी मांडले होते 23 व 24 नोव्हेबर 1968 रोजी मुंबईतील पुरंदरे स्टेडियम येथे *भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष भय्यासाहेब* यांच्या अध्यक्षतेखाली भव्य परिषद घेण्यात आली या परिषदेस दादासाहेबांसहित इतर प्रमुख पुढारीही हजर होते या परिषदेत धम्मकार्याला गतिमानता आणणारे अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले दादासाहेबांना 1969 साली पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांना त्यानंतर या संदर्भात भरीव कार्य करता आले नाही
.
.
0 Comments