Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास


*🌻रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा सुवर्ण इतिहास🌻*

१९५७ ते १९६७ पर्यन्त *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* *कर्मवीर दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड* यांच्या *नेतृत्वात* देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता.
*संस्थापक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून खुल्या पत्रावर आधारित*
स्थापना:- ३० सप्टेम्बर १९५६(दिल्ली)
ज़ाहिर घोषणा:- ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपुर मुक्कामी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापण्याची घोषणा केली.
*१९५७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षा चे लोक प्रतिनिधी*
लोकसभा :- 12 खासदार
विधानसभा:- एकूण २९ आमदार
महाराष्ट्र (१६), पंजाब (५), मद्रास (३), कर्नाटक (२), आंध्रप्रदेश (१), गुजरात (१),
या आमदाराच्या सहकार्याने 1958 ला बॅरि.खोब्रागड़े राज्यसभेत निवडून आले.
पक्षाला मिळालेली एकूण मते २१ लाख ७३ हजार.
*१९६२ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षा चे लोक प्रतिनिधी*
लोकसभा :-  एकूण ३ खासदार
विधानसभा:- एकूण २० आमदार उत्तरप्रदेश(१०), महाराष्ट्र(३), पंजाब(५) मध्यप्रदेश(१), आंध्रप्रदेश (१),
पक्षाला मिळालेली एकूण मते ३२ लाख २१ हजार.
*१९६७ च्या निवडणुकीत निवडून आलेले पक्षा चे लोक प्रतिनिधी*
लोकसभा :-  एकूण १ खासदार
विधानसभा:- एकूण २२ आमदार हरियाणा (२), महाराष्ट्र(५), पंजाब(३) कर्नाटक (१), आंध्रप्रदेश(२),बिहार(१), उत्तरप्रदेश (८),
पक्षाला मिळालेली एकूण मते ३६ लाख ७६ हजार.
*भारत देशातील बहुसंख्य महानगर पालकांमध्ये महापौर, जिल्हा परिषदा मध्ये सभापती, ग्राम पालिके मध्ये सरपंच उप सरपंच बहुसंख्यने निवडून आलेले आहेत.
*अश्या प्रकारे डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेला *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* हा पक्ष १९५७ ते १९६७ पर्यंत भारतात दुसऱ्या क्रमांकावर होता.
*आंबेडकरी जनतेस विनंती आहे कि आज पासून रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्म व पंथ यांच्यात पक्ष्याचे जन्मय व संघटन बनवणे. पण रिपाई शी प्रामाणिक असाल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा*
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल काष्ट फेडरशनच्या  मीटिंग मध्ये निर्णय घेतला की पक्ष्याचे स्वातंत्र अस्तित्व , उद्देश , विचारधारा, अभाधित राखून इतर पक्षाशी निवडणूक समझोता करायला कोणतीही हरकत नाही हा ठराव सर्वानु मते राष्ट्रीय कमिटीत पारित करण्यात आला. यालाच आधार बनवून आजचे रिपब्लिकन पक्षाचे गट युती व आघाड्या समाज्याच्या विकासा साठी करत आहेत. नवीन तरुण कार्यकर्त्यांनी नेत्यांना शिव्या घालण्या पेक्षा स्वतःची भूमिका बजवावी तरच समाज्याचा विकास होईल.

Post a Comment

0 Comments