
अखेर त्या जातिवाद करणाऱ्या युवकावर अस्ट्रोसिटी दाखल
मागील २ वर्ष्यांपासून फेसबुक वरील बायबल मराठी या ग्रुप मधे डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा adv प्रकाश आंबेडकर यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करुण शिविघाळ करत पोस्ट करायचा हे प्रकरण मागील २ वर्ष्यांपासून चालू होत.
आरोपी संतोष रमेश चव्हाण वय २२ ( पेन तरफ, जि रायगड ) हा व्यक्ति फेसबुक ह्या सोशल मीडिया साइट वर फेक अकाउंट नामे १ प्रकाश सपकाळ २ प्रकाश आंबेडकर ३ अब्दुल हक़ ह्या तिन्ही अकाउंट ने संतोष संताप-जनक पोस्ट प्रकाशित करुण २ समाजात तेड़ निर्माण करण्याचे काम करीत होता काल सायंकाळी १८ july २०२० ला संतोष च आधार कार्ड व त्यानी फेसबुक ग्रुप वर केलेल्या पोस्ट चे स्क्रीनशॉट फेसबुक वर वायरल झाल्याने तथा काही युवकांनी रायगढ़ येथले सामाजिक कार्यकर्ते तथा रायगढ़ जिल्हा वं ब आ महासचिव सागर भालेराव याना खबर दिली त्यांनी त्वरित या युवकावर कार्यवाही करण्याची मागणी करत माणगाव रायगढ़ पोलिस स्टेशन ला आयपिसी सेक्शन २९५ अ , आयटी सेक्शन ६५ क प्रमाणे गुन्हा नोंदवून रात्रि २ ते २:३० च्या दरम्यान पोलिसांनी आरोपी संतोष रमेश चव्हाण ला अटक केली होती , परन्तु माणगाव पोलिसानी ही बाब गंभीर न घेता त्यावर जे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते ते न केल्यामुळे त्याला त्वरित जामीन भेटली, राष्ट्रीय युग पुरुषांची अवमानना करणाऱ्या जातिवादी आरोपी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी माणगाव तालूक्यातील बौध्द समाज बांधवांनी पुढाकार घेत विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुष व राष्ट्रमाता यांच्या फोटोंचे विदुपीकरण आणि गलिच्छ, जातिवादी पद्धतीने लिहिनाऱ्या संतोष रमेश चव्हाण या आरोपी ला पुन्हा अटक करण्याची तात्काळ मागणी केली असता व गुन्ह्यांचे स्वरुप पाहता बौध्द समाजातील कार्यकर्ते रविंद्र मोरे , डॉ आदेश घोने यानी समाजाच्या वतीने तात्काळ तक्रार दाखल करत आरोपीवर अस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे त्या अनुषंगाने २३ तारखेला माणगाव पोलिस स्टेशन गु.र.क्र ११७/२०२० भा.द.वि कलम २९५, १५३ (१) (र) (ल), ४९९,५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६७ तथा अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार अधिनियम २०१५ चे कलम यानुसार आरोपीवर अस्ट्रोसिटी दाखल केली आहे या प्रकरणला आज अकरा दिवस उलटून गेले तरीपण एकही लोकप्रतिनिधी किव्हा मंत्री आमदार खासदार या प्रकरणाविषयी बोलताना दिसला नाही किंवा पोलिस स्टेशन माणगाव येथे आला नाही अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments