बौद्ध प्रियंकाच शारीरिक शोषण केलं, मानसिक छेळलं, जातीवरून हिनवलं आणि संपवुन टाकलं!!
भोगली तेंव्हा जात आठवली नाही, साथ देण्याची वेळ आली तेंव्हा महार म्हणत जातीवरून हिनवले. प्रियंकाचा एवढा भयानक छळ केला की तीने स्वतःला फासावर लटकवलं.
अमरावती, चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील दुर्दैवी घटना आहे. बौद्ध तरुणी प्रियंका सोनोने व तिच्याच कॉलेजमधील प्रथमेश गावंडे नामक जातीयवादी तरुण हे 2 वर्षांपासून प्रेम करत होते. लग्नाचं अमिष दाखवून त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. जेंव्हा साथ देण्याची वेळ आली तेंव्हा मात्र त्याने प्रियंकाला जातीवर हिनवायला सुरवात केली. प्रियंका भयानक मानसिक तणावात असायची, प्रियंकाच्या बहीणने सांगितलं की गावंडे प्रियंकाला त्रास देत असायचा, शिवीगाळ, जातीवरून लायकी काढण्याची भाषा करीत असायचा, जीवे मारण्याची सुद्धा धमकी देत असायचा.
घरचे सगळे शेतात गेले तेंव्हा तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जातीयता किती भयानक कोरोना आहे. तिची जात हलकी म्हणून तिचा फक्त भोग घेतला आणि तिला अंगिकरण्याची वेळ आली तेंव्हा मात्र ती महार असल्याचे त्याला जाणवते. एक 18 वर्षीय तरुणी शिक्षणात अतिशय हुशार असलेली प्रियंका या जातीयतेच्या वासनी नराधमाने संपवून टाकली. मनुवादी विचारसरणीच्या पिलावळीने हा बळी घेतला आहे.
प्रियंकाची आत्महत्या नाही तर ती या जातीय व्यसवस्थेने केलेली हत्या आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे. बौद्ध समूहात संताप निर्माण करणारी ही घटना आहे. आमच्या पोरी यांना नागवायला चालतात पण नंदवायला यांच्या अंगावर काटा फुटतो.
पीडित परिवाराने गावंडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोघे तासन तास बोलत असायचे, सगळा डेटा मोबाईलमध्ये आहे.
पोलिसांनी एक दिवस मोबाईल नेला आणि परत आणून दिला. 6 दिवस झाले घटनेला, पोलीस यंत्रणा आरोपीला अटक करत नाही. 18 वर्षाचा पोटचा गोळा गेलाय आणि वरून पोलीस स्टेशनला खेट्या माराव्या लागतायत. वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार केल्यावर आज गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे. या राज्यात दलितांच्या न्यायासाठी दरवाजा आहे की नाही? गृहमंत्री दलितांच्या अन्यायावर बोलणार आहे की नाही? महिला आयोग कुठंय? अनुसूचित जाती जमाती आयोग कुठंय? पगार घेऊन आयोग चालवणाऱ्यांनो, तुम्हाला लाजा कशा वाटतं नाहीत? आंधळी बहिरी तुमची आयोग त्याला आग कशी लागत नाही?
आमच्या बहिणीवर एवढा अत्याचार झालाय. तिचं शोषण झालंय तिला मानसिक हळहळ करून मारलंय ही व्यवस्था गप्प आहे.
एकीकडे प्रियंका रेड्डी हिंदू होती म्हणून आरोपींचं तात्काळ एन्काऊंटर होतं दुसरीकडे प्रियंका सोनोने बौद्ध आहे म्हणून तिच्या आरोपींवर साधा गुन्हा दाखल होत नाही त्याच्यावर कार्यवाही केली जात नाही? एका प्रियंकाला लगेच न्याय तर दुसऱ्या प्रियंकाला कधीच न्याय नाही ही भूमिका मनूवाद्यांची थु तुमच्या जातीयतेवर...
तात्काळ नराधम आरोपीला अटक करा, आटोपीवर कठोर कार्यवाही करा, पीडितांना संरक्षण द्या, गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा, प्रियंकाच्या बहिणीला शासकीय नोकरीत घ्या, गृहमंत्री पीडित कुटुंबाला तात्काळ भेट द्या! इत्यादि मागण्या ऑल इंडिया पँथर सेना करीत आहे. सदरील घटनेतील आरोपींना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन छेडु!!
#JusticeForPriyankaSonone
#JusticeForMandva
#JusticeForBuddhistGirl
पीडित प्रियंकाचा भाऊ सैन्यात आहे तो देशाची सेवा करतोय. देशवासीय सुरक्षित राहावेत म्हणून लढतोय आणि दुसरीकडे जातीय आतांकवाद्यानी त्याच्या बहिणीला संपवून टाकलं.
(पीडितेचा भाऊ : सोनोने +916005425500)

- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑल इंडिया पँथर सेना
0 Comments