जयंत पाटलांच्या मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामफलकाची एलर्जी!
सांगली : वाळवा तालुक्यातील बावची या गावात जातीय तणाव निर्माण झाला आहे. समाजकंठकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बावची मार्ग लिहिलेल्या बोर्डावर पेंट फेकून समाजकंटकाने विटंबना केलेली आहे.
मे 2020 मध्ये हा फलक लावला होता. ग्रामपंचायतला या बोर्डाची एलर्जी होती, कारण ग्रामपंचायत राष्ट्रवादि काँग्रेस जयंत पाटलांच्या नेतृत्वातील आहे. ग्रामपंचायतने बोर्ड काढण्यासाठी 2 पत्र दिलेले आहेत त्यात ते उघड उघड लिहितात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा बोर्ड लावल्यामुळे शांतता भंग होईल. संविधाननिर्माते, महामानव, भारतरत्न असलेल्या महापुरुषांच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसला एवढी चीड का यावी? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बोर्ड लावला तर ग्रामपंचायतला गर्व असायला पाहिजे होता परंतु त्यांना महामानवाच्या नावामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वाटते.
हा मतरदारसंघ नामदार मंत्री महोदय, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, संभाजी भिडेंचे निकटवृत्तीय जयंत पाटलांचा मतदार संघ आहे. बावची हे गाव सतत जातीय संघर्षाने पेटलेलं असतं 2019 ला एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लावलेला होंर्डिंग जाळून टाकण्यात आला होता. तेंव्हाही अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला वर्ष झालं तरी आरोपी जयंत पाटलांच्या कृपने सापडलेले नाहीत. काल बावची गावाला भेट दिली, दलित बांधवाने विनंती केली की आमच्या महामानवाची विटंबना होत आहे याकडे गांभीर्याने पहा, जयंत पाटील यानी बघु बघू म्हणून निघून गेले आहेत.
उद्या दि. 4 आगस्ट 2020 रोजी विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी बावची गाव बंदची हाक दिलेली आहे. अज्ञात आरोपीवर नेहमीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि सामाजिक सलोखा टोकाच्या स्तरावर जाऊन बिघडलेला आहे.
या देशात आणि या राज्यात महामानवाच्या नावाची एवढी चीड का येते? एकीकडे त्याच गावात वेगवेगळे चौक आहेत, त्यांना कसलीही परवानगी लागत नाही. तिथे ग्रामपंचायतला कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं वाटतं नाही. ते त्यांना नोटीस सुद्धा देत नाहीत हा सत्तेचा दुट्टपीपणा आहे.
ऑल इंडिया पँथर सेना सदरील घटनेचा जाहीर निषेध करीत असून जयंत पाटील यांनी जातीय कर्मठ होणं आता थांबवलं पाहिजे असे आमचे त्यांना आव्हान आहे. बावची गावच्या सरपंचावर तात्काळ अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. फलकची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. दलित नेत्यानी दिलेल्या संशयित आरोपीना तात्काळ अटक केली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ हा प्रश्न मिटवला पाहिजे व मोठ्या सन्मानाने, डोलाने फलक झळकू दिला पाहिजे.
सदरील घटनेनी महाराष्ट्रातील आंबेडकरी जनते मध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या राज्यात त्यांच्याच नावाला विरोध करणारी ही समाजकंटकीय पिलावळीला ठेचल पाहिजे.
उद्या बावची गाव बंद आहे. पोलीस यंत्रणा कार्यवाही करण्यास उदासीन आहे. त्यांच्यावर मोठा दबाव आहे. तात्काळ कार्यवाही नाही केल्यास महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल!
जयंत पाटील तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे मंत्री आहात हे विसरू नका!
#जयंतपाटीलहोशमेंआयो
#बाबासाहेब के देश में जातीयवाद नहीं चलेगा
#हुकूमशाहीमुर्दाबाद
#बावचीलान्यायमिळालाचपाहिजे
(स्थानिक : दिनकर मस्के 09890720462)

- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
0 Comments