डॉ बाबासाहेब आंबेडकर बडोद्यास करार प्रमाणे नोकरीस आले खरे परंतु या उच्च विद्याभूषित ज्ञानवंतास बडोद्यात कोठल्याही ठिकाणी राहावयास जागा मलेना कि जेवण्यास खानावळ भेटेना. कारण ते जातीने महार होते ! शेवटी त्यांना नाव बदलवून छुपेनावाने एका पारशी वसतिगृहाचा आश्रय घ्यावा लागला. सयाजीराव महाराजांचे लष्करी कार्यवाह म्हणूनते काम पाहू लागले.
सचिवालयातही ते महार म्हणून त्यांचे सहकारी त्यांच्याशी तुच्छतेने वागत असत . त्यांचा विटाळ होईल म्हणून कामाची कागदपत्र आणि फायली देखील ते त्यांच्याकडे दुरूनच टाकत. ते जात येताना सवर्ण म्हणून घेणारी हि मंडळी त्यांचा स्पर्श होईल या भीतीने अंग चोरून घेत असत आणि बसवायची बैठक हि कुंडीत असे प्यायला पाणीही नसे. बाबासाहेबांना या असल्या अपमानजनक वागणुकीचा फार फार क्लेश होत असे. ज्या पारशी वसतिगृहात ते राहत होते तेथेही कुणीतरी चुगली केली, आणि त्या मंडळींनीही महार म्हणून त्यांना तेथून हाकलून दिले शहरात त्यांना कुणीही धारा दिला नाही बाबासाहेब तहान भूक मारून एका झाडाखाली बसून ढसा-ढसा रडलेत ! माणूस धर्माच्या नावाने एव्हडा हृदयशून्य होऊ शकतो याचा आणखी एक विलक्षण अनुभव त्यांच्या गाठी आला . अस्पृश्य शिकला सवरला तरी तो अस्पृश्यच राहतो हेही ऐक विदारक सत्य त्यांना अनुभवाला मिळालं. बडोद्याची नोकरी सोडून बाबासाहेब पुनःच्छ मुंबईला परत आले पोटाचा प्रश्न पुढे होताच म्हणून त्यांनी एका मित्राच्या खटपटीने दोन विद्यार्थ्याना शिकवण्याचे काम पत्करले. त्या दोन शिवण्या करीत असतांनाच त्यांनी स्टॉक्स आणि शेयर्स या धंद्यातील लोकांना सल्ला देण्याचे काम सुरु केले परंतु सुरुवातीला त्यांचे सल्ला देण्याचे काम चांगले चाल्लायचं परंतु जेव्हा लोकांना कळलं कि बाबासाहेब महार आहेत त्या नन्तर लोकांनी बाबासाहेबाना कडनं सल्ला घ्यायसाठी कोणी येत नव्हते त्यामुळे त्यांनी तेही काम बंद केलं आणि एका पारशी व्यापाऱ्याकडे पत्रव्यवहाराचा व हिशोबठिशेब पाहण्याचे काम स्वीकारावे लागेल. पोटासाठी असे काही करीत असताना देखील त्यांचा विद्या-व्यासंग थांबलेला नव्हता. या सुमारासच त्यांचा "भारतातील जाती" हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. लाहान जमिनीच्या संबंधातील त्या वेळी त्यांनी एक प्रबंध लिहिला होता याच सुमारास त्यांना सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची एक जागा रिकामी झाली होती. बाबासाहेबानी त्यासाठी खटपट केली आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. बाबासाहेब जेव्हा प्राध्यापक म्हणून वर्गावर जाऊ लागले तेव्हा देखील सुरुवातीला महार म्हणून त्यांची विद्यार्थिनी अवहेलना केली "हा महार काय शिकवणार ह्याला तर इंग्लिश पण बोलता येत नसेल " असे ते म्हणत असत परंतु बाबासाहेब शिकवीत असताना त्यांचे सखोल ज्ञान, अर्थशात्राचा सखोल अभ्यास आणि विद्याथ्यांच्या विषयीची कळकळ प्रकट झाल्यावाचून राहिली नाही. ती पाहून मात्र विद्यार्थी त्यांच्या कडे आकर्षक झालेत. बाबासाहेब अत्यंत तयारीनिशी विद्यार्थ्यांना आपला विषय शिकवीत असत. स्वतः अध्ययन करून मग ते अध्यापन करीत असत. ते त्यामुळे ते एक यशस्वी प्राध्यापक ठरले परंतु तरीसुद्धा महार म्हणून त्यांची अवहेलना बंद झालेली नव्हती.
संकलन- रिपब्लिकन चळवळ टीम
संदर्भ:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा
लेखक :- राजा मंगळवेढेकर (पान क्रमांक-१९/२०)
0 Comments