Ticker

6/recent/ticker-posts

निळा झेंडा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा - दीपक केदार

निळा झेंडा काढू नका ही विनंती केली म्हणून ४० जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत या संतापजनक प्रकराचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करतो.

लातूर साकोळा येते भीमाकोरेगाव शौर्य दिनी निळा झेंडा समाजबांधवाने उभा केला होता. गावात इतरही झेंडे आहेत परन्तु पिडब्लडी केवळ निळ्या झेंड्याला विरोध करते, पोलीस यंत्रणा फोर्स घेऊन झेंडा काढायला जाते. अनुसूचित जाती जमातीच्या महिला झेंडा कायम ठेवण्यासाठी विनंती करतात आणि पोलीस यंत्रणा रोखले म्हणून गंभीर स्वरूपाचे गुन्हे 40 समाज बांधवांवर त्यातही जवळपास महिला आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निर्दयी, मानवताहीन प्रशासन यंत्रणेचा जाहीर निषेध!
तात्काळ गुन्हे मागे घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल. पोलीस निरीक्षक कदम यांनी आंबेडकरी जनतेला टार्गेट करू नये. बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीनिवास गंगथडे यांच्या फिर्यादिवरून हे गुन्हे दाखल झाले आहेत समाजाला टार्गेट करण्याचं काम गंगथडे यांनी करू नये. जातीयता डोक्यात ठेऊन आंबेडकरी महिलांना टार्गेट करू नका!
गृहमंत्री तुमच्या राज्यात आमच्यावर फक्त गुन्हेच का?
महिलांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष पुकारला जाईल.

सरकारी कामात अडथळा केल्यामुळे ४० समाज बांधवांवर गुन्हे केलेत दाखल :-
निळ्या झेंड्यास काढण्याचा विरोध करण्यात मुले बांधकाम उप-अभियंता श्रीनिवास गंगधडे यांच्या फिर्यादीवरून बौद्ध समाजबांधवांवर शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत त्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून शिरीष कुमार भगूरम सूर्यवंशी, वंदनाबाई ग्यानबा मांदळे, सुनीता सुनील मांदळे, सुकुमारबाई सोपान सांडुळे, पद्मीणबाई गोविंद सूर्यवंशी, इंदुबाई प्रकाश कांबळे सह ३० लोकांना मुख्य आरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गु.र.नं सी.आर.नं. ३३/२०२१ क ३५३, १२० ब, ४४८, १४३, ३४१, १८८ भा.द.वि कलाम १३५ म.पो का नुसार गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
श्रीधर भीमराव मांदळे यांना पोलीस प्रशासनाने दिलेलं नोटीस. 
निळा झेंडा काढण्यासाठी १४४ धारा लागू करण्यात आली होती.
निळा झेंडा काढण्यासाठी १४४ धारा लागू!
लातूर जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणेचा जाहीर निषेध!!
#लातूर जिल्ह्यातील साकोळा, तालुका शिरूर अनंतपाळ येथील हा गंभीर प्रकार समोर आला आहे. भिमाकोरेगाव शॉर्य दिनी ०१ जानेवारी २०२१ रोजी आंबेडकरी अनुयायांनी साकोळा येथील चौकात निळा झेंडा लावला तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण आहे. याच गावात इतर झेंडे अनेक आहेत ते अतिक्रमण नसतं परन्तु फक्त निळा झेंडा अतिक्रमण असतो. अतिक्रमणाचा नावाखाली येते कोंबिंगची धमकी दिली गेली. अखेर ०३/०२/२०२१ ला हा झेंडा फोर्स लावून काढण्याचा डाव रचलेला आहे. आंबेडकरी अनुयायी दहशतीखाली आहेत. त्यांच्या हातात धमकीचे १४४ चं पत्र टेकून दिलं आहे.
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सदाशिव भिंगे जे अपघातात दगावले त्यांनी आयुष्यातील शेवटचं आंदोलन हा झेंडा उभा रहावा म्हणून केलं होतं येते आता भावना जुडलेल्या आहेत . गावात सर्व झेंडे चालतात मग निळा झेंडाच का चालत नाही? जिल्हा परीषदेची ही जागा परवानगी देऊन जिल्हा अधिकाऱ्यांनी झेंडा नियमित केला तर सामाजिक सलोखा राहील परन्तु शांतता कमिटी हा खेळ फक्त आमच्यासाठीच आहे.
पुरोगामी म्हणणाऱ्या सरकारने उत्तर दिले पाहिजे की, एका गावात निळा झेंडा सोडून सर्व रंगांचे झेंडे असतात ते अतिक्रमित नाहीत परंतु निळाच कसा काय? अतिक्रमित...
ऑल इंडिया पँथर सेना या नोटीसचा निषेध करते नी झेंडा काढू नये अशी मागणी करत आहे. लातूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीने साकोळा येते तात्काळ भेट देऊन संघर्ष उभा करून येतील झेंडा वाचवावा. प्रशासनाला आमचं आवाहन आहे काढायचे असतील तर सर्वच झेंडे काढा उगाच जातीय भावनेतून हे कृत्य करू नका.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ परवानगी देऊन झेंडा कायम फडकू द्यावा अन्यथा राज्यभर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. समाज बांधवांना धमकवण्याचा प्रयत्न करू नका. १४४ धारा लावून दहशत निर्माण करू नका विश्वासात घ्याल तर प्रश्न मार्गी लागेल अन्यथा अस्तित्वाचा लढा सुरू होईल.

- दीपकदादा केदार (ऑल इंडिया पँथर सेना) यांच्या फेसबुक वरून

- रिपब्लिकन चळवळ टीम

 

Post a Comment

0 Comments