त्याची छायाचित्रे ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर या मूर्ती कडे सगळ्या इतिहासकारांचे लक्ष लागले आणि या वास्तू जवळच राहणाऱ्या रहिवाशांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, त्यास अस्तित्वाविषयी काही माहिती नाही. नानान जिल्ह्याचा जिल्हा सांस्कृतिक वारसा विभाग अद्याप शिल्पकलेचा अभ्यास करत आहेत.
चोंगक़िंग रेडिओच्या वृत्तानुसार, हि मूर्ती किती जुनी आहे आणि हि कोणी बनवली याविषयी अधिकाऱ्याना अद्याप माहिती नाही आणि संबंधित अधिकारी त्याच्या सांस्कृतिक मूल्याची चौकशी करीत आहेत. जिल्हा कार्यालयाने सांगितले की सुमारे १९५० च्या दशकात पुतळ्याचे डोके नष्ट करण्यात आले.
या ठिकाणी आधी लीझू नावाच्या मंदिराची स्थापना १९१० ते १९४० च्या दरम्यान झाली. १९८७ मध्ये ते पाडण्यात आले आणि त्याच ठिकाणी आर्किटेक्टने १९९० मध्ये मंदिराच्या जागी आता दोन निवासी इमारती बांधल्या गेल्या. सदर शिल्पकला त्या भागात झाडाची पाने साफ करण्याच्या वेळी उघडकीस आली . १९९० च्या दशकात जिल्हास्तरीय संरक्षित सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांची ओळख झाली.
- रिपब्लिकन चळवळ टीम
0 Comments