गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी (१२ मार्च २०२१) अज्ञात युवकांनी गुहा क्रमांक ७ च्या नजीकच्या झाडाला आग लावली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बीएएमयू) परिसराच्या मागे विजयींद अरण्य बुद्ध विहारच्या जवळपासची सुमारे ३००० झाडे भस्मसात झाली.
भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी तातडीने अग्निशमन दलाला आणि पोलिसांना आगीच्या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल आणि बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली आणि सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी विहार भागात सुकलेल गवत पेटविल. काही मिनिटातच ही आग परिसरात वाऱ्या सारखी पसरली आणि या भागातील सुमारे ३००० झाडे त्याच्या तावडीत सापडली. माहिती मिळताच कित्येक लोकांनी विहार क्षेत्राकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तास प्रयत्न करून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी बुद्ध लेणी क्रमांक ७ जवळ बुद्ध विहारची स्थापना केली आहे. स्वयंसेवकांनी या भागात अनेक वृक्षांचे पालनपोषण केले होते. दरवर्षी येथे रोप लागवड कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. काही असामाजिक घटकांनी जाणीवपूर्वक झाडे पेटविली असल्याचा आरोप भदंतअभयपुत्र महाथेरो यांनी केला आहे.
कठीण परिस्थितीमध्येही वृक्षांची जोपासना :-
भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी बुद्ध लेणी क्रमांक. ७ जवळ डोंगरालगत गेल्या ४-५ वर्षांपूर्वी विजयिन्द अरण्य बुद्धविहाराची उभारणी केली असून तेव्हा पासून त्यांनी परिसरात जेसीबी च्या साहाय्याने गड्डे खोदून हजारो झाडे लावली होती. भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी कठीण परिस्थितीत या वृक्षांची जोपासना केली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भीमराव हत्तीअंबीरे यांनीही याठिकाणी दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेऊन हजारो झाडे लावलीत व त्यांचे संवर्धनही होते. सध्या हा परिसर पूर्ण पणे हिरवाईने नटला होता. विहाराचा विकास व रम्य वातावरण पाहून समाजकंटकांनी हेतूपूरस्कर हि आग लावली असा आरोप भदंत अभयपुत्र महाथेरो यांनी केला आहे.
- रिपब्लिकन चळवळ टीम
0 Comments