Ticker

6/recent/ticker-posts

बौद्ध तरुणीवर घरात घुसून चाकूने हल्ला

 



रक्ताच्या थारोळ्यात जीवन मरणाशी झुंज सुरू...

पुन्हा महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आली आहे सादर प्रकरण हे सायन कोळीवाडा मुंबई इथली आहे, प्रेमाच्या नावाखाली त्याने अफाट छळ केला. भांडण एवढं भयानक की ६ वेळा जबर मारहाण करण्यात आली. कधी तोंड फोडलं, कधी मुका मार दिला, कधी कामाच्या ठिकाणी जाऊन मारलं तर कधी रस्त्यावर मारलं. अफाट शोषण सुरू होतं. अशावेळी तू कामाला का जातेस, तू माझ्याशी लग्न कर अशा धमक्या देत गेला... तिला वाटलं हा सैतान आताच असं वागतोय लग्नानंतर काय करेल म्हणून तिने नकार दिला. घरच्यांनी नकार दिला.
येता जाता तिला तो मारत राहिला, पीडित तरुणीच्या कुटुंबाला धमकी देत राहिला, भांडणांनंतर बळजबरी लग्नाची मागणी केली. लग्न करत नाही म्हणून घरात सर्व असतांना चाकूने बौद्ध तरुणीला ३ वेळा भोकसून फरार झाला.
सायन कोळीवाडा येथील गुंड प्रवृत्तीचा आरोपी स्वतःला उच्चवर्णीय समजणारा नराधम याने या तरुणींचं आयुष्य उद्धवस्त केलं आहे. आता ती तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे.
गेली 2 महिने ती या निर्दयी गुंड सैतानाशी झुंज देत होती. जातीवरून हिनवत राहिला. तिला संपवण्याच्या इराद्याने त्याने तिला भोकसून पळाला. हा देश महिलांसाठी सुरक्षित नाही. येते कालच महिला दिन साजरा झाला आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. जाऊन पोलिसांना आपली व्यथा सांगावी असं वातावरण पोलीस यंत्रणेचे राहिले नाही.
पोलिसांनी 307 सुद्धा लावला नव्हता, अट्रोसिटी ऍक्ट लावलेला नाही. किती उदासीनता आरोपी चाकु मारून 3 दिवसांपासून फरार आहे. पीडितांना संरक्षण दिलेले नाही. मुख्यमंत्री ज्या मुंबईत राहतात तिथे बौद्ध सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नाहीत, पोलीस न्यायाच्या भूमिकेत नाहीत.
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करते की, तात्काळ अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे. आरोपीला अटक झाली पाहिजे. पीडित बौद्ध तरुणीला वाचवण्यासाठी सरकारने पाऊलं उचलली पाहिजे. पीडित कुटुंबाला तात्काळ संरक्षण दिले पाहिजे. एफआयआर दाखल करण्यास विलंब करणाऱ्या व अट्रोसिटी ऍक्ट कलम न लावणाऱ्या, आरोपीला अटक न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करावे.
महाराष्ट्रात ग्रामीण भाग ते मायानगरी पर्यंत बौद्ध सुरक्षित नाहीत. गणेश येडके मृत्यूशी झुंज देतोय तोच सायन कोळीवाडा येथील तरुणीच्या ह्रदयद्रावक घटनेने मन हेलावून गेलं.
गृहमंत्री या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. नैतिक जबाबदारी घ्या आणि खुर्ची खाली करा. या तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला अटक झालीच पाहिजे.
सत्ता गांडुळांनो, गोचीड औलादीनो, किती दाबणार आहात कीती मुक्के अन आंधळे होणार आहात रक्त दिसत नाही का? रक्ताच्या थारोळ्यात पडलेली निरागस दिसत नाही का?
तिच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत का? तुमच्या घरी लेकी नाहीत का? का बधिर होतो तुमचा मेंदू का तुमच्या गांडीला घाम फुटतं नाही? कोणती आहे कातडी तुमची तुमच्या अंगाला काटा का फुटत नाही?सैतानाच्या फौजांचे रक्षक तुम्ही सत्ता हाकणार्या शिळपाट मनुवादी हस्तकांचे गुलाम तुम्ही? तुमचा धिक्कार असो.. तुमचा निषेध असो...
- दीपक केदार ऑल इंडिया पँथर सेना - रिपब्लिकन चळवळ टीम

Post a Comment

0 Comments