Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस स्टेशन मध्ये बौध्द समाजातील महिलेला मारहाण

पोलिस स्टेशन मध्ये बौध्द समाजातील महिलेला मारहाण

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा मधील अकोले तालुक्यात घडलेली हि घटना आहे.हे प्रकरण १७/०४/२०२१ रोजी सायंकाळी ८:०० वाजता सुमारास पोलिस स्टेशनच्या आवारात घडलेल आहे.
अमोल येवले नावाच्या इसमाने फेसबुक ह्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बौध्द समाजाप्रती घृणास्पद वक्तव्य पोस्ट करीत तथागत गौतम बुद्ध यांच्या बदल गलिच्छ भाषा वापरीत समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व जाणून बुजून चीड येईल असे वक्तव्य केले त्यावरून बौध्द समाजाचे अनुयायी संतोष साळवे यांच्या समवेत समाजातील लोकांनी येवले यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु उलट त्याने दमदाटी करीत शिवीगाळ केली. यासंबंधी अकोले पोलिस स्टेशन मध्ये रीतसर फिर्याद देण्यास गेले होते.यावेळी भाजप कार्यकर्ते शिवाजी धुमाळ हे आरोपीला वाचविण्याच्या हेतूने मध्यस्थी करीत असताना त्यांनी पोलिसान समोर शिवीगाळ,दमदाटी करीत महिलेला मारहाण केली आहे.या घडलेल्या प्रकारात पोलिस निरीक्षक यांनी अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा किंवा तक्रार नोंद केलेली नाही.याची माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक साहेब यांनी नुसता अहवाल मागितला आहे. मा. पोलिस अधीक्षक साहेब यांना याबाबत चे सर्व पुराव्यासह व्हिडिओ हे एका पेनड्राईव मध्ये दिले आहेत.तरी देखील कोणतेही ठोस निर्णय किंवा कार्यवाही करण्याचे आदेश अद्यापही दिलेला नाही.सध्याची परिस्थिती पाहता समाजाचा उद्रेक होण्याआधी लवकरात लवकर गुन्हा दाखल करून ज्या पोलिस अधिकाऱ्यांसमोर हा सर्व प्रकार घडला आहे तरी त्यांनी हलगर्जी पणा केला अश्या निष्क्रिय पोलिस अधिकाऱ्यांना देखील सह आरोपी करून त्यांच्यावरही खात्या अंतर्गत कारवाई करावी.तसेच आरोपी अमोल येवले हा भाजप आयटी सेलचा जिल्हा पदाधिकारी आहे त्याचीही सोशल मीडियावर बौध्द समाजाबद्दल कायम वादग्रस्त विधान करून समाजात तेढ निर्माण करीत असतो याबद्दल अकोले पोलिस स्टेशन ला त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.तसेच त्याच्या समरणार्थ आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ यांनीही संबंधितावर आमदार खासदार यांच्या मार्फत पोलिस प्रशासनावर दबाव टाकत आहे. सदर प्रकरण हे १६/०४/२०२१ ला सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट वरून सुरू झाले आहे.  सर्व पीडित हे बौद्ध व मातंग समाज असुरक्षित आहे त्यांना त्वरित पोलिस संरक्षण द्यावे. अशी मागणी केली जात आहे. वरील सर्व पीडित हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असल्याची तालुकाध्यक्ष राहुल पवार यांनी माहिती दिली.

टीप:- वरील पोस्ट हि ट्विटर वरून घेण्यात आलेली आहे. 
टीप:- खालील पोस्ट तुमच्या पर्यंत माहितीस्तव करत आहोत. कोणाच्याही समाजबांधवांच्या भावना दुखवायच्या नाहीत फक्त त्यांच्या वर कार्यवाही व्हावी  उद्देशाने आम्ही खालील पोस्ट लिहीत आहोत.

भिमसैनिकानो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सोशलमीडीया वर होणारा अपमान तुम्ही का सहन करता ?

मागच्या पाच वर्षयांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फेसबुक/ट्विटर/इंस्टाग्राम/रेडिट.कॉम/linkedin.कॉम अश्या प्रकारच्या अनेक सोशलमीडीया वेबसाइट आणि चैटिंग ऍप्स वर डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज अश्लील प्रकारे एडिट करुण पोस्ट करतात जर त्या पोस्ट वर जर कोणत्या यूजर नी त्या पोस्ट विरोधात कमेंट केल्यास त्या यूजर ला पेज तर्फे ब्लॉक करण्यात येते ,  ह्यांचे पोस्ट चे जर स्क्रीनशॉट काढून साइबर सेल ला तक्रार केलि तरी आरोपी वर कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने ह्या प्रकारचे क्राइम जास्त वाढतात ह्या कड़े सरकार ने अथवा पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष्य केल्यास ह्याच्या परिणाम भयंकर असू शकतो
१ फेसबुक
फेसबुक वरील बाइबल मराठी ह्या ग्रुप मधे १५३ फेक अकाउंट असून ह्या समुहात डॉ बाबासाहेब आंबेडकर , माता जिजाऊ , माता रमाबाई आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज अश्या अनेक महा-पुरुषांवर टिका अथवा त्यांचे फोटोज एडिट करुण त्यावर शिविगाळ करत पोस्ट करतात त्यामधील फेक आयडी प्रकाश सपकाळ / प्रकाश आंबेडकर नावाने चालवत असणारा आरोपी संतोष रमेश चव्हाण (रायगढ़) ह्याला १८ जुलै २०२० च्या मध्यरात्रि २ ते २ : ३० च्या दरम्यान माणगाव रायगढ़ पोलिस नी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी चे रायगढ़ जिल्हा महासचिव सागर भालेराव यांच्या सुचने नुसार संतोष चव्हाण ला अटक केलि होती. 
  * बायबल ग्रुप बद्दल थोडक्यात माहिती
हा ग्रुप प्रामुख्याने ख्रिश्चन लोकांचा असून ह्या ग्रूपला एडमिन नाही हा ग्रुप ६ sep, २०१६ ला बनवण्यात आला होता परन्तु  २०१८ ला ग्रुप एडमिन ची आयडी बंद पडल्याने ग्रुप ला जातीयवादी लोक येणे चालु झाले १ मार्च २०१८ ला पहिली जातिवादी पोस्ट करण तिरपुडे नामक व्यक्तिने केली तेव्हा पासून या ग्रुप मधे २ समाजात टेड निर्माण करण्याचे कारस्थान चालू झाले त्यातील काही नावे अथवा त्यांची पोस्ट चे स्क्रीनशॉट पुढील प्रमाणे





काही लिंक्स देत आहे कृपया त्या पोस्ट सुद्धा पहाव्यात 


२ Twitter
ट्विटर हे विविधप्रकारच्या ट्रेंड्स आणि न्यूज़ साठी प्रसिद्ध आहे त्यात सुद्धा महापुरुषांचा अपमान केला जातो  परन्तु बरेचसे भीमसैनिक  ट्विटर वापरत नसल्याने  त्यांना ट्विटर वर होणाऱ्या अपमान बद्दल माहीत नाही ते आज मि तुम्हाला या लेखा द्वारे सांगणार आहो


वरील पोस्ट पाहुन चकित होउ नका  पेज च नाव आंबेडकर एंड पॉलिटिक्स आहे अणि पोस्ट च्या खाली जयश्रीराम चा नारा ? आणि लिहिलेल बघा सनातन के तेज से कोई अछूता नहीं रह सकता ? म्हणजे काय ? हे पेज चालवणारा खरच आंबेडकर चळवळ चा माणूस आहे का असा प्रश्न आपणास पडतो


३. रेडिट.कॉम

रेडिट.कॉम हे सुद्धा एक प्रकारचे सोशल नेटवर्किंग साइट आहे ही साइट भारतातील ९०% लोकांना माहीत नाही कारण ही साइट अमेरिका मधून ऑपरेट होते  भारतात फक्त १२००० लोकांचेच अकाउंट ह्या वेबसाइट वर आहे या सोशल नेटवर्किंग वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होते त्याचे स्क्रीनशॉट पुढे दिले आहेत


                                                           

४. इंस्टाग्राम <instagram >

इंस्टाग्राम सुद्धा फेसबुक सारखच स्टेटस शेयरिंग आणि पोस्ट करण्याच अथवा नविन मित्र बनवण्याच सोशल नेटवर्किंग साइट आहे इथे सुद्धा डॉ बाबासाहेबांवर शिविगाळ कैप्शन टाकून पोस्ट करतात त्यातले काही स्क्रीनशॉट्स अथवा पोस्ट च्या लिंक्स खालील प्रमाणे






A post shared by Kala kutta (@kalakutta_memes) on 






https://www.instagram.com/memeraoambedkar/

५. https://memechat.app/posts/1/443042/1



लिंक :- https://memechat.app/posts/1/1087424/1

लिंक :- https://memechat.app/posts/1/946005/1

मित्रानो असे खुप साऱ्या लिंक्स आणि स्क्रीनशॉट्स आहेत पण मला कोणाच्या ही भावना दुखवायच्या नाहीत हे पोस्ट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी केलेली आहे जर कोणाला या पोस्ट विषयी कोणताही संदेह असेल तर त्यानी कमेंट कराव्यात ही विनंती
टीप :- ह्या पोस्ट चा उद्देश्य फक्त एकच आहे की भीमसैनिकानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची फोटोज एडिट करणाऱ्याला शोधून कार्यवाही व्हावी अशी माझी मागणी आहे
जय भिम

- रिपब्लिकन चळवळ टीम 

Post a Comment

0 Comments