Ticker

6/recent/ticker-posts

गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्याकडे वाटचाल करा - एस.टि.धम्मदिक्षीत


जय भीम नमो बुद्धाय!!!

आज आपल्या समाजाला खरी गरज आहे ती, बुरसटलेल्या अंद्धश्रद्धेच्या नावाखाली चालणार्या प्रथा,व देवी देवता यांच्या कचाट्यातून मुक्त करण्याची तसेच अंद्धश्रद्धेच्या नावाखाली ब्राह्मण पुरस्क्रत देव दगडाचे अंध विश्वास ठेवून देवाच्या अंध गुलामगिरीतून मुक्त होऊन सत्याकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
                 ज्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि,एक वेळ तुमची एक झाली तर ती मान्य केली जाईल पण तुम्ही चुकीच्या बाजूला उभे राहिलात तर येणारा काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही.त्याप्रमाणे आज आपला समाज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले धर्मांतर १४ आक्टोबर १९५६ सालीच केले आहे.तर आपल्याला सत्य आणि विज्ञानाच्या आधारावर आधारित धम्म दिला आहे.पण आपला समाज मात्र १९५६ पासून आजपर्यंत २०१८ आले तरी सुद्धा अजुनही त्या बुरसटलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त का झाला नाही?
१) आपल्या समाजातील साक्षरतेचे प्रमाण कमी आहे.
२) शिक्षणापासून वंचित राहिला आहे, याचं कारण की आपल्या समाजातील प्रत्येक लोकांच्या आयुष्यात अठरा विश्व दारिद्र्य मध्ये भरडतोय.
३) मी मान्य करतो किंवा त्या वेळेस परिस्थिती नव्हती किंवा आपल्या समाजातील प्रत्येक मनुष्याला शिक्षण मिळू शकेल याच कारणामुळे आपला समाज शिक्षणापासून दूर राहिला आहे.
४) पण आपल्या समाजातील लोक जे शिकु शकले ते सुद्धा शिकले ते फक्त आप आपल्या उदरनिर्वाह करण्याकरिता ते आपल्याला जेवढी जमेल तेवढे शिक्षण घेतले.
५) आणि जे शिकले मोठे झाले ते आप आपल्या संसाराचा गाडा हाकण्यात गुंग राहिले.
६) तसेच काही लोक मात्र शिकुन सुद्धा त्याच जुन्या चालीरीती परंपरा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निर्जीव दगडांचा देव समजून त्यांच्या अंध आशेने देव करील ते होईल.या हेतूने अंद्धश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटले गेले.
७) काही तर बाकीचे लोक काय म्हणतील याचा विचार करून त्यांनी धम्माकडे पाठ फिरवून त्या निर्जीव दगडांचा देव डोक्यात घेऊन आजपर्यंत जगतात आहेत.
८) पण काही मात्र फक्त नावालाच बाबासाहेब आंबेडकर यांना मानुन आपली पोळी भाजून घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
९)तर काहींनी तर दगड उत्सव करणं ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजातील लोकांना प्रभावीत करून त्या निर्जीव दगडांचा देव डोक्यात घेऊन सर्वांना दगड बनविले आहे.
१०) शिक्षण घेऊन सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेतलेच नाहीत. 
 मी म्हणत नाही की, सर्वांनी धम्म स्वीकारला पाहिजे,पण जे शिकले आहेत त्यांनी तरी किमान बाबासाहेब समजून घेणे गरजेचे आहे.बाबासाहेबाचे विचार आपल्या समाजातील लोकांना पटवून सांगणे गरजेचे आहे.समाज खरंच खूप अंद्धश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटला आहे.तो बाहेर काढण्यासाठी शिक्षीत तरूणांची गरज आहे आज समाजाला अंधारांतुन प्रकाशात नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.  
  महाकवी          वामन दादा कर्डक म्हणतात कि,
      भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर,
तलवारी चे त्यांच्या न्यारेच टोक असते.
एकत्र सगळे राहीले असते.स्वत्ताचे नाही,समाजाचे हित पाहिले असते.
समाजाचे चित्र बदलले असते,गरीब येथे कुणीच नसते,अन्याय अत्याचार झालेच नसते.येथे समतेचा समाज असता.
         जय भीम!!!!

✍आयु.सुभाष धम्मदिक्षीत.९६११२५३४४१.

Post a Comment

0 Comments