सध्या जगात आणि बऱ्याच देशांत कोरोना सारख्या महामारी चे महाभयंकर संकट आलेले आहे असे असतांना देखील रुग्णांच्या मदतीसाठी डॉक्टर,नर्स,वॉर्डबॉय,ऍम्ब्युलन्स तथा ऍम्ब्युलन्स ड्राइवर,पोलीस प्रशासन व अनेक सामाजिक संघटना मदत करण्यासाठी समोर आल्यात त्याच सोबत अनेक बौद्ध विहार मध्ये कोविड सेंटर देखील चालू करण्यात आलेले आहेत आणि तेथे ऑक्सीजन, मेडिसिन आणि रुग्णांच्या जेवणाची सोय केली जात आहे.
वायरल पोस्ट
मागील १-२ दिवसांपासून फेसबुक-व्हाट्सएप्प-ट्विटर अश्या अनेक सोशल मीडिया वर एक पोस्ट फिरतेय ती पुढील प्रमाणे " दीक्षाभूमी (नागपूर) येथून ऑक्सिजन प्लांट बनवण्यासाठी केली १२० कोटींचे केले दान. , त्याच बरोबर एक फोटो सुद्धा वायरल होत आहे त्या फोटोमध्ये टीव्ही-9 मराठी या वृत्तवाहिनीचे लोगो आणि यु-ट्यूब चॅनेल ची लिंक दिलेली आहे व त्यासोबतच एक इंस्टाग्राम अकाउंट ची लिंक सुद्धा आहे त्या लिंक वर आम्ही गेलो असता त्या व्यक्तीने स्वतःच्या अकाउंट वरून पोस्ट केल्याचे खंडन केलेलं आहे. या संदर्भात अनेक व्यक्तींनी पोस्ट केलेली आहे परंतु या बातमीचे चे अजूनही पुरावे न भेटल्यामुळे आमच्या टीम ने दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले (सदानंद फुलझेले यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलाला सचिव बनवण्यात आले.) यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दीक्षाभूमी (नागपूर) येथून ऑक्सिजन प्लांट बनवण्यासाठी केली १२० कोटींचे केले दान. या बातमीचे खंडन केले समोर त्यांनी म्हटलं, "बातमी खरी नाही हि बातमी पूर्णतः खोटी आहे या संदर्भात लवकरचं एक व्हिडीओ प्रसारित करण्यात येईल. सोबतच त्यांनी समाजाला आव्हाहन सुद्धा केलं कि खोट्या बातम्या पसरवू नका. " संध्याकाळी ४-५ च्या दरम्यान दीक्षाभूमी स्मारक समिती चे सचिव सुधीर फुलझेले यांनी एक विडिओ प्रसारित केलेला आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे कि,"काही समाज माध्यमातून दीक्षाभूमी ने ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी काही रक्कम दिल्याची खोळसळ बातमी प्रसारित होत आहे,हि बातमी जर खरी असती तर दीक्षाभूमी आणि सर्व समाजाला खूप आनंद झाला असता पण दुर्दैवाने हि बातमी खोटी आहे. दीक्षाभूमी ने कोरोना विरुद्ध च्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवायचा म्हणून माननीय जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून कळवले आहे कि दीक्षाभूमी वरील यात्री निवास आम्ही कोरोना च्या रुग्णांना च्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ आणि त्या साठी लागणाऱ्या सर्व सेवा आम्ही आमच्या कडून उपलब्ध करून देऊ हीच एक दीक्षाभूमी कडून कोरोना च्या विरुद्ध घेतलेले एक पाऊल आहे."
- रिपब्लिकन चळवळ टीम.
1 Comments
thanks for information.
ReplyDeletejay bhim.