शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान . परंतु काय तुम्हाला हे माहिती आहे कि शिवनेरी किल्ल्याच्या सर्व बाजूने २००० वर्षापूर्वीच्या ५० बौध्द लेण्या आहेत. या ५० बौध्द लेण्या चार समूहामध्ये विभागलेल्या आहेत . सन १८८५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ब्रिटिश गॅझेट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि शिवेनेरी किल्ल्याच्या सर्व बाजूने ५० बौध्द लेण्या आहेत . भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडेही या सर्व ५० लेण्यांची नोंद आहे . जुन्नर कडून शिवनेरी किल्ल्याच्या रस्त्याने गेल्यास उजवीकडे शिवनेरी लेणी कडे पाहिल्यास स्पष्ट दिसते कि किल्ल्यावर अनेक लेण्या आहेत.
शिवनेरी बौध्द लेण्या या चार समूहामध्ये विभागलेल्या आहेत . पहिला समूह १२ लेण्यांचा असून असून साखळीच्या पायवाटेवर रेलिंगच्या डाव्या बाजूला आहेे . तर दुसरा समूह आह २५ लेण्यांचा असून साखळीच्या पायवाटेवर रेलिंगच्या उजव्या बाजूला आहे . पहिले दोन्ही लेणी समूह हे जुन्नर च्या दिशेला पूर्वेकडे तोंड करून आहेत. तिसरा समूह हा ६ बौध्द लेण्यांचा असून शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेला असून नानेघाटाकडे तोंड करून आहे. चौथा बौध्द लेणी समूह हा सात लेण्यांचा असून शिवनेरी किल्ल्यामध्ये असलेले शिवाई देवी मंदिर याच चौथ्या बौध्द लेणी समूहातील समूहामधील एका लेणी मध्ये आहे.
शिवनेरी टेकडी, पूर्वेकडील, जुन्नरहून दिसते. |
शिवनेरी बौध्द लेणी प्रथम लेणी समूह : पहिला समूह हा १२ बौध्द लेण्यांचा असून शिवनेरी किल्ल्यावर साखळीच्या पायवाटेवर रेलिंग च्या डाव्या बाजूला आहे. या लेनिसामुहामध्ये एकूण १२ बौध्द लेण्या असून यातील ४ क्रमांकाच्या लेनिमध्ये धम्मभाषा पाली मधील व धम्मलीपी अर्थात ब्राम्ही मध्ये लिहिलेला एक शिलालेख आहे . ब्रिटीश गॅझेट मध्ये त्या शिलालेखाचा अर्थ “भूतनाक याने पाण्याच्या टाकीसाठी दान दिले” असा दिलेला आहे . या लेणी समूहामधील अनेक लेण्यांच्या प्रवेशद्वारावर लाकडी कोरीव दरवाजा असल्याच्या खाचा आहेत . तसेच अनेक लेण्यांमध्ये धरण्यासाठी किंवा काही रस्सी वैगरे बांधण्यासाठी कोरीव काम केलेलं आहेत .
प्रथम लेणी समूहाकडे जाण्याचा मार्ग : जुन्नर कडून शिवनेरी किल्ल्याकडे जाताना शिवनेरी किल्ल्याच्या मुख्य पायथ्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे २ ते ३ kilometer उजव्या बाजूला महलक्ष्मी lawns आहे . महलक्ष्मी lawns च्या बाजूने उजवीकडे एक छोटा रस्ता जातो . त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यास गाडी पार्क करून किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास किल्ल्याची आत्ताच्या काळात बांधलेली संरक्षक भिंत दिसते. ती भिंत एका ठिकाणी थोडीशी तुटलेली आहे . तिथे आपण एक मोठा Arrow मार्क केलेला आहे . हा Arrow मार्क महलक्ष्मी lawns पासूनही दिसतो . हा एर्रोव मार्क follow करत गेल्यास पुढे अनेक Arrow मार्क दिसतात . या पाय वाटेलाच साखळदंड मार्ग किंवा Chain Road म्हणतात . गुगल मॅप मध्ये हा साखळदंड मार्ग किंवा चैन रोड दिसतो . या मार्गाने एक तास ट्रेकिंग केल्यास रेलिंग आणि कोरीव पायर्या दिसतात. या रेलिंगच्या डाव्या बाजूला काही लेण्या दिसतात . याच शिवनेरी किल्ल्यावरील प्रथम समूहातील बौध्द लेणी . परंतु रेलिंग पासून या लेणीवर जाण्यास पायवाट अस्तिवात नाही . त्यामुळे ट्रेकिंग ची रोप असल्याशिवाय या प्रथम लेनिसामुहाकडे जाऊ नये .
शिवनेरी बौध्द लेणी द्वितीय लेणी समूह : शिवनेरी बौध्द लेणी द्वितीय लेणी समूहामध्ये २ उप समूह असून हा एकूण २५ लेण्यांचा समूह आहे . पहिला उपसमुह ११ लेण्यांचा असून दुसरा उप समूह १४ लेण्यांचा आहे . साखळीच्या पायवाटेवर रेलिंगच्या उजव्या बाजूला हा द्वितीय लीणी समूह आहे . हे दोन्ही लेणी उपसमूह हे जुन्नर च्या दिशेला पूर्वेकडे तोंड करून आहेत. या लेणी समूहामधील १४ क्रमांकाची लेणी ही दुमजली लेणी आहे . लेणीचे क्रमांक हे पहिल्या मुख्य लेनिसमुहापासून ते चौथ्या मुख्य लेनिसामुहापर्यंत सलग डावीकडून उजवीकडे असे दिलेले आहेत . या समूहा मधील १४ क्रमांकाच्या लेनिमध्ये पाली भाषेतील धाम्मालीपी मध्ये लिहिलेला एक शिलालेख असून ब्रिटीश गॅझेट प्रमाणे त्याचा अर्थ मुधकिय मल आणि गोलीकीय आनद या दोघांनी या लेणीसाठी दान दिले असा दिलेला आहे .या समूहातील २२ क्रमांकाच्या लेणी मध्ये पाली भाषेतील व धम्मलीपी मध्ये लिहिलेला एक एक शीलालेख आहे . परंतु सध्या तो वाचता येऊ शकत नाही . याच शिलालेखाच्या सुरुवातीला बौध्द धर्मातील त्रिरत्न चिन्ह कोरलेले आहे . हे त्रिरत्न चिन्ह जर आडवे केले तर ते हुबेहूब ओम सारखे दिसते . या समूहामधील लेणी क्रमांक २३ च्या सुरुवातीला बाहेरील डाव्या बाजूवर एक सुंदर घोडा कोरलेला आहे .
या समूहाच्या उजव्या बाजूला एक १४ लेणींचा उपसमूह असून त्यास स्थानिक लोक १२ गडद किंवा १२ लेण्या असे म्हणतात . या १४ लेण्यांच्या उप समूहामध्ये ३० क्रमांकच्या लेनिमध्ये १२ शुन्यागार किंवा छोट्या खोल्या आहेत . म्हणूनच या १४ लेण्यांच्या उप समूहास स्थानिक लोक १२ गडद म्हणतात . २७ क्रमांकाच्या लेनिमध्ये एक छोटा स्तूप व पाली भाषेतील धम्म लीपिमधील शिलालेख आहे . २८ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर पेंटिंग आहे . सध्या या पेंटिंग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत . ३२ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर ही पेंटिंग आहे . ३५ क्रमांकाच्या लेणीमध्ये पाच छोट्या खोल्या असून या लेनिमध्ये ही एक स्तूप आहे . या सर्वांमध्ये ३६ क्रमांकाची लेणी ही मुख्य चैत्यगृह असून यामध्ये एक मोठा स्तूप आहे स्तुपाची उंची अंदाजे ३० फुट आहे . तसेच चार कोरीव स्थंभ आहेत. या लेणीच्या छतावर ही उत्कृष्ट पेंटिंग आहे . पेंटिंग अजूनही दिसते आहे . पण पेंटिंग चे संवर्धन जर झाले नाही तर पेंटिंग नष्ट होऊ शकते . या लेणीच्या बाहेरील वरांड्या च्या छतावर ही पेंटिंग आहे . पण ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच वरांड्या मध्ये एक पाली भाषेतील धम्म लीपिमधील एक शिलालेख आहे . ३७ क्रमांकाच्या लेनिमध्ये ही एक पाली भाषेतील धम्म लिपीमधील एक शिलालेख आहे.
द्वितीय लेणी समूहाकडे जाण्याचा मार्ग : महलक्ष्मी lawn शेजारील पायवाटेने गेल्यास साखळी मार्गाच्या रेलिंग च्या उजव्या बाजूला द्वितीय लेणी समूह आहे . या मध्ये दोन उपसमूह असून दोन्ही उप समूहाकडे जाण्यासाठी आपण दिशादर्शक मार्किंग केले आहे. रेलिंग चालू होण्याच्या अगोदर एका ठिकाणी “बौध्द लेणी” असे शब्द लिहून दोन Arrow मार्किंग केले आहेत . हे दोन्ही अर्रोव मार्किंग च्या दिशेने गेल्यास आणखी बरेच Arrow मार्किंग दिसतात व ते Arrow मार्क तुम्हाला दोन्ही उप समूहाकडे घेऊन जातात .
©मनोज ओव्हाळ
१ मार्च २०१८ फाल्गुन पौर्णिमेला या उपक्रमा मध्ये सहभागी झालेले सदस्य : मनोज ओव्हाळ (पुणे) , अमोल गोरे (नाशिक ), दयानंद पाटेकर (पुणे), प्रकाश दिपके (वाशीम), प्रवीण जाधव (मुंबई)
आर्टिकल लिंक- https://bit.ly/2R5cXwM
0 Comments