विकता देव कशाला हवा....???
पश्र्चिम महाहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा तसा पाऊसपाणी तसेच ऊस भात अशा अनेक प्रकारच्या पीकांनी समृद्ध म्हणायला हरकत नाही.याच जिल्ह्यातील शेवटच्या टोक म्हणजे आमच्या तालुक्यातील सातशे ते आठशे लोकसंख्या असलेलं डोंगराच्या कपारीत वसलेलं खेड गाव . गावात येणाऱ्या दळणवळण व्यवस्था म्हटली तर दिवसाकाठी पाच सहा गाड्या तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात .तालुक्याच्या गावाला जायचे म्हंटले तरी पन्नास रुपये गाडी भाडे लागते.गावात प्राथमिक शाळा आहे .पहिली ते चौथी चार वर्ग भरतात.लेकरु दहा वर्षाचं झालं कि पुढील शिक्षणासाठी त्याला आज घडीला पायपीट करून साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जवळच्या माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो.त्यांनंतर महाविद्यालय मग पुढे बाजाराच्या गावी जवळपास पंधरा रुपये गाडी भाडे खर्च करून दररोज ये जा करावी लागते. मी ही याच सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या आहेत.गावात शेती सोबत पशुपालन दुग्धव्यवसाय केला जातो.
गावात तशा दोन दुध संकलन केंद्र आहेत.गावातील लोकांचं श्रद्धास्थान असणारं ग्रामदैवत तसेच मारुतीचे मंदिर सुसज्ज स्थितीत दिमाखात उभे आहे.पुजा अर्चा साधना भजन कीर्तन असे अनेक कार्यक्रम याठिकाणी होत असतात. हि सगळी परिस्थिती सांगण्यामागचं कारण एव्हढंच कि हे मी अनुभवले आहे.याच परिस्थिती मध्ये मी वाढलो आहे.आज घडीला जानेवारी उलटून गेला की फेब्रुवारीला पहिल्या आठवड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई हे मोठं संकट गावासमोर वर्षानुवर्षे सतावत असते.आजही गावात फिल्टराईज पाणी मिळत नाही.पिण्याच्या पाण्याच्या टाकीत औषध टाकुनी तेच पाणी गावात नळाद्वारे सोडले जाते.गावात डोंगरात पाण्याचा साठवण तलाव आहे.दरम्यान याच तलावाचे पाणी मोटारीने याच पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सोडलं जातं.एरवी गावाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या विहिरीतील पाणी त्याच पिण्याच्या टाकीत सोडलं जातं.तसेच दरम्यान जुन महिना येईपर्यंत पाण्यासाठी वणवण करावी लागते.
गावातील एकंदरीत लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती सोबत पशुपालन दुग्धव्यवसाय हा असल्याने गावाशेजारी असणार्या डोंगरावर प्रत्येकांच्या जनावरांना लागणारा चारा उपलब्ध होत होता.त्याठिकाणी पावसाळ्यात वाढणार्या गवताला राखुन सर्व गावानं मिळुन ते कापुन हिस्से केले जायचे.हे आजवर चालत आलेलं चक्र आहे.तर सोबत असणार्या तलावामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला होता.
बर्यापैकी हे सर्व चाललं असताना फिरणार्या भुरट्या भामट्या उपद्व्यापी पोटभरु थोतांड भोदु बाबाची नजर लागली म्हणायला हरकत नाही.खरं पहाता लोकांना यानं एकंदरीत फसवलचं.त्याच सविस्तर वर्णन पुढीलप्रमाणे मी सांगणार आहेच.
तसा हा बाबा जवळचा नसुन शेजारच्या कर्नाटक राज्यातील एका गावचा आहे.देव नावाचं अन् त्याच्याकडील असणार्या भंडार्यांनी लोकांची दिशाभूल केली.गावची लोकही त्याच्या या थोतांडाला बळी पडत गेली.तोही तितकाच शहाणा की सुरवातीला त्यांनं चार लोकं जमवली हां हां म्हणता गावभर त्याचा बोभाटा झाला.अन किमान सहा महिन्यांत त्यांनं आपलं बस्तान मांडणं सुरवात केली.गावात होऊ लागल्या मिटिंगा अन् त्या मध्ये याची चर्चा सुरू झाली.एकामागोमाग अनेक लोक यांच्या भंडार्याला बळी पडलीच.लगोलग त्याला त्याच्या थोतांडाला जागा देण्यास तयार झाली.काही कालावधी नंतर चतुर बाबानं या जाळ्यात शेजारच्या गावातील अनेक लोक जमवली अन् सर्वांची मिळून एक कमिटी स्थापन करण्यात आली.गावमिटिंगमध्ये या नवीन विकत्या देवाला बसण्यास थोडी नव्हे दहा एकर जमीन देऊ केली. सहा महिन्यांत त्यांचे अनेक प्रयोग होऊ लागले.जेवणावळीच्या पंगती उठु लागल्या तो त्याला प्रसाद म्हणायचा.यामागचं रहस्य पहा हं त्या प्रसादाला लागणारा सर्व साहित्य गावातील तांदुळ घरपती बाकिचे लाकडे वैगरे सर्व साहित्य गावचं ते त्या डोंगरावर पोहोचवणं साहाय गावचं तिथं मंडप वैगरे सर्व गावाचाच त्या डोंगरावर विजपुरवठा पंचायत मार्फत असा त्यांचा सुपर मार्केट बाजार गावानं मांडुन दिला. काही लोकांनी म्हणजेच हातावरच्या बोटावर मोजता येतील इतकेच होते ते विरोध केला पण गावांनं वेड्यात काढलं पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली तर त्या वेळी आम्ही गावांनं या बाबाला पुजारी म्हणुन ठेवले आहे असं सांगून त्यांची त्यातुन सुटका करण्यात आली. पण हा तर भांमटा असल्यानं त्यानं ओळखलं व त्या देवाची प्रतिष्ठापना करायाच्या हेतुन ते पाषाण अन् देवालयाची चौकट मागवुन गावातील पुढार्यांनी तालुक्यातील म्हणजेच मतदार संघातील आमदार तसेच अनेक राजकारणी मंडळी घेऊन मिरवणूक काढून एकदा त्यांची गादी बसवली. बरेच दिवस उलटून गेले.
तो बांबानं गरळ ओकत म्हटला की या डोंगरावर पाणी लागणार आहे.लोकांनी वर्गणी काढून पैसा जमा केला वत्याच्या समोर त्या देवालयाजवळ बोअरवेल मारला. एक नव्हे तब्बल दोन झाले.अखेर पाणी लागलेच नाही.त्याचं थोतांड उघडं पडलं होतं.पण त्यांनं शकल्ल लढवली व प्रत्येक अमावस्या दरम्यान प्रल्हाद सत्र चालू केलं लोकं विसरुन गेली भंडार्यात बुडून गेली. दोन वर्ष झाली.लोकांनी मांडलेल्या दुकानात आरामात तो पैसा कमवत आहे. दरम्यान चर्या काळात त्या बाबांचा प्रवास अपघात झाला.तो दवाखान्यात उपचार घेत आहे.मग तो लोकांचे इतके प्रश्न सोडविण्यासाठी गाव सोडून त्या डोंगरावर येऊन राहिला. मग त्याला देवानं अपघातात वाचवलं का नाही.किंवा अपघात घडणार आहे हे त्याला कळलं कसं नाही.
लेख लिहिण्याचा उद्देश इतकाच की,गावात दोन देवस्थान असताना त्यांची मनोभावे पूजा करायचं सोडून त्या विकत्या देवाला डोक्यावर बसवुन घेऊन गायी वासरांचा चारा घालवला.देऊ केलेल्या जमिनीत चारा उगवणार नाही.त्यानं पेरलेल्या थोतांडाची फळं उगवुन येतील.पुढे हा थोतांड बाबा गावाला थुक्का लावुन सदर जमिन विकुन निघुन जाईल.या गोष्टीला लोक आजही अनभिज्ञ आहेत.
आयु.एस.टि.धम्मदिक्षीत.
काळामवाडी.कोल्हापुर.
९६११२५३४४१.
0 Comments