Ticker

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कॅनडा ने घेतला हा मोठा अभिमानास्पद निर्णय !

भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिलला १३० वी जयंती साजरी होत आहे. केंद्र सरकारने या वर्षीपासून १४ एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कॅनडातील एका प्रांतातही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल हा 'समता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे  

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये १४ एप्रिल रोजी सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातही १४ एप्रिल रोजी समता दिन साजरा करण्यात येणार आहे. समाजातील जातीव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारत मानवेताल समानतेची वागणूक मिळवून देण्यास डॉ. बाबासाहेबांनी मोठी लढाई लढली. भारतीय संविधानातून प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकारही मिळवून दिला. त्यामुळे, कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. 

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये एक पत्रही जोडलं आहे, त्यानुसार कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात १४ एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा होणार आहे. 

 


१४ एप्रिल राष्ट्रीय हॉलिडे 

डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, १४ एप्रिल २०२१ रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, १८१८ च्या सेक्शन २५ च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सराकरने देखील गेल्या वर्षी १४ एप्रिल हा राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली होती. 

बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला?

मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेब आपल्या शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत. 

बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषा विषीयीचे ज्ञान

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी भाषा, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी अनेक भाषांवर प्रभुत्व होते. जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.


- रिपब्लिकन चळवळ टीम

Post a Comment

0 Comments