● मी होटेल कामगार बोलतोय●
महिण्यांनंतर मिळणारा मोबदला
आता बंद झालाय संचारबंदी निवळेपर्यंत
होटेललाही टाळं ठोकलयं बंदीचं पोस्टर चिकटुन
विस्तारलेला विषाणाचा नायनाट होईपर्यंत
पेटलेल्या चुली विझल्या बंदच्या हाकेनं
पण पोटात उसळलेल्या भुकेच्या तांडवाला सांगता
येत नाही होटेलं बंद झालंय म्हणून....
शासणांनं सरकारी नोकरदारांना
बंदच्या दिवसाचा पगार लागु केलाय
पण छोट्या मोठ्या उपाहारगृहात
काम करणार्या कामगारांचा उपाय काय....
मालकांनी होतं नव्हतं देऊन टाकलं
म्हणे आता होटेल बंद आहे
तुमचं तुम्ही बघा...
कामावरती असताना सहा महिण्यांनी
मागितलीच रजा म्हणे मिळणार नाही
कामगारावरती मालक तुम्ही
का हक्क दाखवता उगा...
गावी येऊन काय खावं
कडीकोयंड्यात गावच बंद
शासणाचा नियम सरकारी नोकरदारांना
भरपायी देतो
मग सांगा आता
तुम्हीच कामगारमंत्री साहेब
आम्ही कोणता केलाय गुन्हा...
उडवाउडवीची उत्तरे नकोयत साहेब
किमान एक महिण्याचा पगार तरी द्या ना...
जिवंत असतील कामगारमंत्री
त्यांनी होटेल कामगारांकडं
कामगारांच्या प्रश्नांकडे जातीनं लक्ष द्यावं
कोसळुन पडलेल्या होटेल
कामगारांना मदतीचा हात द्यावं....
आयु.एस.टि.धम्मदिक्षित.
काळामवाडी.कोल्हापुर.
९६११२५३४४१.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
कवितेला शेअर करा जेणेकरून मा.कामगारमंत्र्यांपर्यंत पोहचली पाहिजेत.
हा माझा एकट्याचा प्रश्न नसुन भारतातील तमाम असंघटित होटेल कामगार दिवसमजुर वेठबिगार अनेकांचे हाल असेच आहेत.
.
1 Comments
Nice sar
ReplyDelete