Ticker

6/recent/ticker-posts

हे आता थांबायलाच पाहिजे -एस.टि.धम्मदिक्षीत

हे आता थांबायलाच पाहिजे....!! स्वातंत्र्याची सत्तर वर्षे उलटून गेली तरीही आजही त्या जुन्या रुढी परंपरचं ओझं अंगाखांद्यावर घेऊन टाचा खरडत दंडोरा पेटवत आजही माणसांणं असं गल्लोगल्लीतुन हालगी वाजवत का फिरावं............?? पुरोगामी महाराष्ट्रात अनेक चळवळी कार्यरत आहेत.चांगलं कार्य करतात त्याबद्दल दुमत नाही.पण आपण खरंच स्वतंत्र भारतात जगतो आहोत का हा प्रश्न मला पडतो आहे.याच कारण ही असचं आहे.व्यक्ती स्वातंत्र , विचार स्वातंत्र हे कुठे तरी हरवत चाललंय का? माणुस पुन्हा पारतंत्र्यात बुडला जातोय का? आजही समाजात गावात माणुस हा माणूस म्हणून जगतोय का?मग यासर्व प्रश्र्नांची उत्तरे हो अशी आली तर मग त्याच माणसानं का दिंडोरा पेटवावा गावभर , गल्लिबोळातुन,वाड्यावस्त्यातुन,दगडांतुन, अन् पावसाळ्यात चिखलातुन ढिगभर कुत्र्याच्या गराड्यातुन त्यांनंच का बरं हिंडावं दंवंडी पेटवत.हे कितपत योग्य आहे. आंबेडकरवादी चळवळीत काम करणाऱ्या हरेक माणसाला माझा प्रश्न आहे.काय करते चळवळ कुठे असते .इथं माणसांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हरवलं जातयं.माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही.मग आम्ही अशा हजार चळवळी काढुन अनेक संघटना काढुन स्वताचा तोरा मिरवत आहोत का?? आजही गावागावांतील आपल्या समाजातील व्यक्तीने दंवंडी पेटवण्याची प्रथा गेलेली नाही.मेलेल्ल्याची शेण स्मशानापर्यंत नेण्याची रुढी परंपरा बंद झाली नाही.मढ्याच्या जागेचे पाय आम्हीच का मोजावेत. गावच्या ग्रामदेवालयात गार्हाना घालताना आम्हीच का म्हणायचे व्हय जी स्वामी महाराजा...गार्हाणा घालणारा सर्वांचे भले करो अशी विनवणी देवासमोर करत असताना उपस्थित लोकांनी का म्हणू नये व्हय जी स्वामी महाराजा ....त्यांची तोंड असतात ना. अहो आजही गावातील रेशन असो किंवा शासकीय पाहुना किंवा गाव मिटिंग अन् पाळणुक मग आम्हीच का गावाला बोंबलुन सांगावे उद्या अमुकतमुक आहे म्हणून का गावात इतर कोणी राहत नाही का? कोणतंही इलेक्शन असो मी या अमुक तमुक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस अमुक तमुक सांगुन याला मतदान करा त्याला करा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.असं भासवुन सर्वांचा तोरा मिरवणारे चळवळीतले चोर भामटे कुठे जातात हे सगळं रामायणं आपल्या सोबत घडत असताना. का तेंव्हा चळवळ मेलेली असते का? तेंव्हा कुठे जातात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार फुकटचा मलिदा खायला का? अहो इथे निळ्या टोप्या डोक्यावर घालुन रातीच्या बुचात वाकुन चळवळ जिवंत राहणार नाही.पांढरे कपडे घालून कोणी पुढारी होत नसतो.कशाची चळवळ करताय तुम्ही कुनाच्या तोंडास पाने पुसताय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खडकावर विचारांचा मळा पिकवलाय रे अन् त्या मळ्यातील फळे आपण खात आहोत हे लक्षात घ्या.उगाच ऊर बडवून जयभिम बोललं की चळवळ झाली असं नाही. या जुन्या रुढी परंपरा नेस्तनाबूत झाल्याच पाहिजेत.प्रत्येक आपल्या समाजातील लोकांना महामानवाचे विचार समजावून सांगितले पाहिजे.त्यांच्या विचारांवर चालण्यास प्रवृत्त केले पाहिजे.त्याचे आचरण व्हायलाच पाहिजे.हे विचार तुमच्या डोक्यात का येत नाहीत.पद प्रतिठा म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्ही कार्य करत असाल तर चुकिच आहे.गावात घरात समाजात माणसांत माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी सतत कार्यरत रहा.आजुबाजुच्या आपल्या समाजातील त्याच व्यक्तींना आज कोरोना सारखा जीवघेण्या रोगासंदर्भात गावात दवंडी पेटवुन सांगावं लागतं विचार करा तो ही माणुसच आहे. हे कुठे तरी थांबायलाच हवं.....? आयु.एस.टि.धम्मदिक्षीत. काळामवाडी.कोल्हापुर. ९६११२५३४४१.

टीप :- वरील कविता एस.टि.धम्मदिक्षीत यानी स्वतःह लिहिलेली आहे ह्यात कसल्याही प्रकारचा कॉपी-राइट नाही ..

Post a Comment

0 Comments